King Movie : जगातील ‘या’ सुंदर देशात शाहरुख खानच्या 'किंग'चे खास सीन्स शूट होणार, आहे खास कनेक्शन

Shah Rukh Khan : शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'किंग' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. शाहरुखच्या या चित्रपटातील काही खास सीन्स युरोपमध्ये शूट करण्यात येणार आहेत.
Shah Rukh Khan
king movieSAAM TV
Published On

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसाठी २०२३ हे वर्ष खूप खास होते. यावर्षी शाहरुखचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले आणि तिन्ही चित्रपट मोठ्या पडद्यावर खूप हिट झाले. पठाण, जवान, डंकी या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

Shah Rukh Khan
Big Boss Marathi 5: निक्की-अरबाजच्या भांडणानंतर बिग बॉसच्या घरात ब्रेकअपची अंताक्षरी; सदस्यांनी दोघांनाही चिडवलं, पाहा VIDEO

2023 गाजवल्यानंतर आता किंग खान (Shah Rukh Khan) एका नवीन चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असताना दिसत आहे. शाहरुख खान सध्या त्याचा आगामी चित्रपट 'किंग'मुळे चर्चेत आहे. आता या चित्रपटाशी संबंधित एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या चित्रपटातील काही खास सीन्स युरोपमधील अतिशय सुंदर शहरात शूट करण्यात येणार आहेत.

युरोपमधील खास लोकेशन

मीडिया रिपोर्टनसार, 'किंग' (King Movie )चित्रपटाचे काही खास सीन बुडापेस्ट, हंगेरीमध्ये शूट केले जातील. हे युरोपमधील लोकप्रिय शहर आहे. जिथे दरवर्षी कोटीच्या संख्येने लोक भेट देण्यासाठी येतात.

Shah Rukh Khan
KBC Winner News : रातोरात करोडपती झाला बिहारचा रिक्षावाला, एका कॉलने बदलले नशीब

किंग चित्रपट

शाहरुख खानच्या किंग या चित्रपटाचे अद्याप शूटिंग सुरू झालेले नाही. चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्टनसार, किंगचे शूटिंग सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला सुरू होऊ शकते. हा चित्रपट शाहरुख खानसाठीखूप खास ठरणार आहे, कारण या चित्रपटात शाहरुखची मुलगी सुहानाही (Suhana Khan ) दिसणार आहे. या चित्रपटात अभय वर्मा आणि सुहाना एकमेकांच्या विरुद्ध दिसणार असल्याचे बोले जात आहे. या चित्रपटाचा खलनायक अभिनेता अभिषेक बच्चन आहे. तो एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.

Shah Rukh Khan
Kangana Ranaut: कंगना रनौतने अंधेरीमध्ये खरेदी केलं नवं ऑफिस, किंमत ऐकून व्हाल चकीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com