Kangana Ranaut: कंगना रनौतने अंधेरीमध्ये खरेदी केलं नवं ऑफिस, किंमत ऐकून व्हाल चकीत

Kangana Ranaut Purchases New Property: कंगनाने मुंबईमध्ये कोट्यवधीची प्रॉपर्टी खरेदी केली आहे. मुंबईतील पॉश एरिया असलेल्या अंधेरीमध्ये कंगनाने ही प्रॉपर्टी खरेदी केली.
Kangana Ranaut: कंगना रनौतने अंधेरीमध्ये खरेदी केलं नवं ऑफिस, किंमत ऐकून व्हाल चकीत
Kangana RanautSaam Tv
Published On

बॉलिवूड अभिनेत्री आणि लोकसभा खासदार कंगना रनौत सध्या आपला अपकमिंक चित्रपट 'इमर्जन्सी'मुळे चर्चेत आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशामध्ये कंगना रनौत पुन्हा चर्चेत आली आहे. यामागचे कारण म्हणजे कंगनाने मुंबईमध्ये कोट्यवधीची प्रॉपर्टी खरेदी केली आहे. मुंबईतील पॉश एरिया असलेल्या अंधेरीमध्ये कंगनाने तब्बल १.५६ कोटी रुपयांमध्ये नवी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. या जागेमध्ये कंगना तिचे ऑफिस सुरू करणार आहे. कंगना रनौतने २३ ऑगस्ट रोजी तिने ही डील केली.

मिळालेल्या माहितीनुसार, कंगना रनौतने अंधेरी पश्चिममध्ये नव्या ऑफिससाठी ४०७ स्क्वेअर फूटांची जागा खरेदी केली आहे. प्रॉपस्टॅकने दावा केला आहे की, कंगना रनौतने खरेदी केलेली जागा आर्क वन ऑफिस कॉम्प्लेक्समध्ये असेल. हे चंद्र गुप्ता इस्टेटने विकसित केले आहे. महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीमध्ये (MahaRERA) त्याची नोंदणी ऑक्टोबर २०२२ ची आहे. हा प्रोजेक्ट २०२६ मध्ये पूर्ण होणार आहे.

कंगना रनौतने वांद्रे येथील आपला बंगला ४० कोटींना विकला. त्यानंतर तिने हे नवं ऑफिस खरेदी केलं असल्याचे बोलले जात आहे. कंगनाने खरेदी केलेल्या नव्या ऑफिसची जागा ३८,३९१ रुपये प्रती फूट कार्पेट एरियाच्या दराने विकण्यात आली आहे. २३ ऑगस्टला ही डील झाली असून या प्रॉपर्टीसाठी तिने ९,३७,५०० रुपये स्टॅम्प ड्युटी देखील भरली. तसंच ३० हजार रुपये रजिस्ट्रेशन फीज दिली आहे.

कंगना रनौतने मागच्या वर्षी एका मुलाखतीत सांगितले होते की, मुंबई महानगर पालिकेने तिच्या वांद्र्यातील पाली हिल येथील बंगल्याचा काही भाग २०२३ मध्ये पाडला होता. यासाठी कंगना यांनी नुकसान भरपाईची मागणी केली होती. मात्र आता त्यांना ही भरपाई नको आहे. कंगना रनौतने चित्रपटांमध्ये करिअर केल्यानंतर हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी झाली. सध्या ती भाजपची खासदार आहे. कंगना रनौतने मे २०२४ मध्ये २८.७ कोटींची जंगम मालमत्ता आणि ६२.९ कोटींची स्थावर मालमत्तांसह ९१ कोटींपेक्षा जास्त संपत्ती असल्याचे घोषीत केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com