Jawan Cast Fees: 'जवान'साठी एकट्या शाहरुखनं घेतलं १०० कोटींचं मानधन; या मल्टीस्टारर चित्रपटातील इतर कलाकारांनी घेतली भरभक्कम फी

Shah Rukh Khan Fees For Jawan Movie: शाहरुख खानचा आत्तापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचे चर्चा आहे.
Shah Rukh Khan charge 100 crore for Jawan
Shah Rukh Khan charge 100 crore for JawanInstagram @redchilliesent

How Much Jawan Actors Charges For Movie:

शाहरुख खानच्या जवान चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी जवानचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमधील शाहरुख खानला पाहून सगळेजण चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

७ सप्टेंबरला जवान प्रदर्शित होणार आहे. शाहरुख या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. नुकतेच त्याने तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. त्यापूर्वी तो विष्णोदेवीला देखील जाऊन आला होता.

जवानची रिलीज देत जस जशी जवळ येत आहे तस तशी प्रेक्षकांना चित्रपटाविषयी उत्सुकता वाढत आहे. प्रेक्षक चित्रपटाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी धडपडत आहेत.

Shah Rukh Khan charge 100 crore for Jawan
HBD Pankaj Tripathi: मला ईश्वरने पाठवलय... पंकज त्रिपाठीनी चित्रपटात काम मिळविण्यासाठी लढवली भन्नाट शक्कल

जवान चित्रपटाचीजात आहे. क्रेझ पाहता हा चित्रपट पाहिल्याची दिवशी इतिहास रचेल असे दिसत आहे. चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग देखील जबदस्त झाले आहे.

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे बजेट ३०० कोटी असल्याचे म्हटले जात आहे. तसेच या शाहरुख खानचा आत्तापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचे चर्चा आहे.

३०० कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती आहे माहित आहे का? चला जाणून घेऊया.

Shah Rukh Khan charge 100 crore for Jawan
Rang Maza Vegala: 'कलर गया तो पैसा वापस..!', 'रंग माझा वेगळा' मालिकेला निरोप देताना असं का म्हणाली दिपा?

जवान चित्रपटामध्ये शाहरुख खान दुहेरी भूमिका साकारणार आहे. या चित्रपटासाठी शाहरुख खानने १०० कोटी घेतल्याचे म्हटले आहे. तसेच चित्रपटाच्या प्रॉफिटमधील काही टक्के देखील तो घेणार आहे.

साऊथ अभिनेत्री नयनतारा जवान चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपसाठी नयनताराने ११ कोटी रुपयांचे मानधन घेतल्याचे अहवालात म्हटले आहे.

तर चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारणारा विजय सेतुपती चित्रपटासाठी २१ कोटी मानधन घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन चित्रपटामध्ये कॅमिओ करणार आहे. दीपिका एका चित्रपटासाठी १५-३० कोटी घेते. मात्र जवानमधील काही मिनिटांच्या कॅमिओसाठी तिने २५-३० कोटी घेतले असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

चेन्नई एक्सप्रेसमध्ये शाहरुख खानसोबत दिसलेली अभिनेत्री प्रियामणी देखील चित्रपटामध्ये दिसणार आहे. तिने या चित्रपटासाठी २ कोटी रुपये चार्जे केले आहेत.

दबंग चित्रपटातील अभिनेत्री सान्या मल्होत्राने देखील या चित्रपटामध्ये दिसणार आहे. तिने देखील या चित्रपटासाठी १-२ कोटी रुपये घेतले असल्याचे बोलले जात आहे. (Latest Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com