Sara - Ibrahim Bond: वेड्या बहिणीची वेडी माया... हरवलेल्या इब्राहिमला शोधण्यासाठी साराची धडपड; व्हिडिओ व्हायरल

Sara Celebrate Her Movie: सारा तिची आई अमृता आणि भाऊ इब्राहिमसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेली होती.
Sara Found Ibrahim and gets relaxed
Sara Found Ibrahim and gets relaxedInstagram @iakpataudiii

Sara Cares For Ibrahim : सारा अली खान सध्या तिच्या 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतीच सारा तिची आई अमृता आणि भाऊ इब्राहिमसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. तिथे त्यांना पापाराझींनी स्पॉट केले. सारा आणि इब्राहिमला पाहून चाहत्यांनी आणि पापाराझींनी खूप गर्दी केली होती.

थिएटर बाहेरचा या सारा-इब्राहिमचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये सारा भाई इब्राहिमला शोधताना दिसत आहे. चला पाहूया नक्की काय शोधतेय सारा इब्राहिमला. (Latest Entertainment News)

Sara Found Ibrahim and gets relaxed
Urfi Javed New Dress: हीच खरी चहा लव्हर! चहाचा मळा अंगावर घेऊन फिरतेय उर्फी जावेद; व्हिडिओ होतोय व्हायरल

सारा आणि इब्राहिम तिचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'जरा हटके जरा बचके' पाहण्यासाठी मुंबईतील एका चित्रपटगृहांमध्ये गेले होते. चित्रपट पाहून बाहेर येताच पापाराझींनी दोघांना घेरले. पापाराझीं इब्राहिमला सतत चित्रपट कसा आहे हे विचारात होते. पापाराझींच्या गऱ्हाळ्यात इब्राहिम पुढे निघून गेला.

साराला गर्दीत इब्राहिम दिसला नाही. तसेच सोबत असलेल्या गार्डने देखील 'बाबा गाडीत नाही'. त्यानंतर सारा इब्राहिमला जोरजोरात आवाज देते आणि त्या गर्दी घुसते. सारा, इब्राहिमला सुखरूप गाडीपर्यंत आणते. त्याला गाडीत बसवते, गाडीचे दार लावते.

साराने इब्राहिमला गर्दीतून बाहेर काढल्यानंतर पापाराझीं तिला असं का केलं विचारतात. तेव्हा सारा पापाराझींना म्हणते, लहान भाऊ आहे (छोटा भाई है). त्यांच्या हा भावा-बहिणीचा गोड व्हिडिओ म्हणूनच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

साराने याआधी देखील इब्राहिम हरवल्याचे सांगितले होते. 'द कपिल शर्मा शो'मध्ये साराने सांगितले होते की, 'इब्राहिमला हरवायची सवय. तो बऱ्याचदा हरवला आहे आणि आम्ही त्याला शोधले आहे. आता आम्हाला पण सवय झालीय. पहिल्यांदा तो मॉलमध्ये हरवला होता. आम्ही खूप घाबरलो होतो.'

सारा अली खान आणि विकी कौशल यांच्या 'जरा हटके जरा बचके' चित्रपटाने बॉक्स ऑफिस आतापर्यंत २२ करोड इतकी कमाई केली आहे. हा चित्रपटाचा पहिला आठवडा होता. दोघेही चित्रपटाचे दमदार प्रमोशन करत आहेत. त्यामुळे चित्रपट आणखी यशस्वी होईल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com