Shubhaman- Sara Dating Rumors: अरे नेमक्या कोणत्या साराला डेट करतोय? शुभमन गिलने नेटकऱ्यांच्या प्रश्नाला दिलं उत्तर...

Shubhaman- Sara Relationship Update: शुभमन गिल सध्या त्याच्या क्रिकेट विश्वातील चांगल्या कामगिरीमुळे चर्चेत असला, तरी सध्या तो खासगी आयुष्यामुळे बराच चर्चेत आला.
Shubhaman- Sara Unfollow In Eachother
Shubhaman- Sara Unfollow In EachotherSaam Tv

Shubhaman- Sara Unfollow In Eachother: सध्या शुभमन गिल आयपीएलमुळे कमालीचा चर्चेत आला आहे. आयपीएलच्या रणधुमाळीत शुभमन गिल त्याच्या हटकेबाज खेळीमुळे कमालीचा चर्चेत आहे. यावर्षी आयपीएलचा १६ मौसम सुरू असून आयपीएलसध्या शेवटाकडे आहे. काल क्वालिफायर २ चा सामना अवघ्या महाराष्ट्राने पाहिला. त्या सामनामुळे शुभमन गिल कमालीचा चर्चेत आला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या क्वालिफायर २ सारख्या या सामन्यात गुजरातच्या या सलामीवीराने तब्बल ४९ चेंडूत दमदार शतक झळकावलं. अनेकदा शुभमन गिल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. शुभमन त्याच्या लव्ह लाईफमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.

Shubhaman- Sara Unfollow In Eachother
Satyaprem Ki Katha New Song Released: 'सत्यप्रेम की कथा' मधील 'नसीब से' गाणे प्रदर्शित; कार्तिक - कियाराचा पुन्हा दिसला रॉमँटिक अंदाज

अनेकदा शुभमनचं नाव काही अभिनेत्रींसोबत नाव जोडलं जात आहे. कधी सारा तेंडुलकर तर कधी सारा अली खानमुळे तो चर्चेत आहे. नेटकऱ्यांनी दोघींसोबतही त्याचे नाव जोडल्यामुळे सध्या त्याची चर्चा सुरू आहे. सध्या शुभमनची एक मुलाखत सोशल मीडियावर कमालीची व्हायरल होत आहे. या व्हायरल होत असलेल्या मुलाखतीत त्याने नक्की कोणाला डेट करत आहे, यावर भाष्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून शुभमन- सारा एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होत आहे. अनेकदा हे दोघेही एकत्र स्पॉट देखील झाले होते.

जरी ही जोडी एकमेकांना डेट करत असली, तरी त्यांनी अद्याप त्यांच्या रिलेशनच्या चर्चांना दुजोरा दिलेला नाही. या दोघांनीही अद्याप तरी या विषयावर बोलणं टाळलं आहे. मात्र आता ही जोडी पुन्हा चर्चेत आली असून या जोडीचा ब्रेकअप झाल्याची माहिती मिळत आहे. शुभमन आणि सारा आधीच वेगळे झाल्याचा सध्या दावा केला जात आहे. या जोडीचा सध्या ब्रेकअप झाला असला तरी, या दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केलं आहे. आता नेमकं यांच्यात कास बिनसलं याचा सर्वांनाच प्रश्न पडला आहे. दोघांनीही आपापसात बोलून वेगळा होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.

Shubhaman- Sara Unfollow In Eachother
Manoj Bajpayee In CHYD: मनोज वाजपेयींची थुकरटवाडीत एन्ट्री, स्नेहल शिदमसह सर्वच सेलिब्रिटींनी केले निखळ मनोरंजन...

यापुर्वी सारा अली खान आणि सारा तेंडुलकर या दोघींचही शुभमन गिल सोबत नाव जोडलं जात आहे. २०२० पासून यांच्या रिलेशनची चर्चा सुरू आहे. सारानं शुभमनचा ‘आवडता खेळाडू’ म्हणून उच्चार केला आणि आयपीएल २०२० दरम्यान त्याच्या फिल्डींगचंही तिने कौतुक केलं होतं. अनेकदा दोघांनाही पापाराझींनी रिलेशनबद्दल विचारलं आहे. शुभमन आणि सारा तेंडुलकर लवकरच त्यांच्या नात्याची घोषणा करणार असं असतानाच ब्रेकअपची बातमी समोर आली. दोघांनाही त्यांचे चाहते चिडवतात.

Shubhaman- Sara Unfollow In Eachother
Jefferson Machado Death: ब्राजीलियन अभिनेता जेफरसन मचाडोचे निधन, 4 महिन्यांपासून होता बेपत्ता

अशातच सारा तेंडुलकरमुळे सारा अली खान आणि शुभमन गिलमध्ये काही तरी बिनसलं असल्याची सध्या चर्चा होत आहे. शुभमनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, त्याने ‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडरव्हर्स’ मध्ये भारतीय स्पायडर-मॅन पवित्र प्रभाकरला आवाज दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com