Manoj Bajpayee In CHYD: मनोज वाजपेयींची थुकरटवाडीत एन्ट्री, स्नेहल शिदमसह सर्वच सेलिब्रिटींनी केले निखळ मनोरंजन...

Manoj Bajpayee: बॉलिवूड सेलब्रिटींनाही भूरळ घालणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये लवकरच मनोज वाजपेयी हजेरी लावणार आहेत.
Manoj Bajpayee In CHYD
Manoj Bajpayee In CHYD Saam Tv

Manoj Bajpayee News: नेहमीच मराठी टेलिव्हिजनसृष्टीत प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ची वेगळीच क्रेझ आहे. या शो मध्ये आता पर्यंत अनेक मराठी सेलिब्रिटी आले असून काही बॉलिवूड सेलिब्रिटी देखील आले. बॉलिवूड सेलब्रिटींवर भूरळ टाकणाऱ्या या कार्यक्रमात लवकरच आणखी एक बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावणार आहे. यावेळी या शोमध्ये मनोज वाजपेयी यांनी हजेरी लावली आहे.

Manoj Bajpayee In CHYD
थिएटरमध्ये धमाकेदार कमाई करणारा ‘Ponniyan Selvan 2’होणार OTT वर प्रदर्शित; मात्र प्रेक्षकांना मोजावी लागणार मोठी किंमत...

नेहमीच प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ च्या कलाकारांनी मनोज वाजपेयी यांचे निखळ मनोरंजन केले. नुकताच झी मराठीच्या सोशल मीडिया पेजवर आगामी भागाचा टीझर शेअर करण्यात आला आहे. मनोज वाजपेयी सोबत यावेळी थुकरटवाडीत संतोष जुवेकरने पण हजेरी लावली होती.

नुकताच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये, थुकरटवाडीतील कलाकारांच्या विनोदाने मनोज बाजपेयीलाही हसू अनावर झाल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. आतापर्यंत या शो मध्ये फक्त मराठी सेलिब्रिटींनीच नाही तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी ही हजेरी लावली आहे. प्रत्येकाचे निखळ मनोरंजन करत या शो ने आणि त्यातील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले.

Manoj Bajpayee In CHYD
Sudipto Sen Hospitalize: ‘द केरला स्टोरी’च्या दिग्दर्शकांची तब्येत बिघडली; रुग्णालयात उपचार सुरू...

सोबतच यावेळी स्नेहल शिदम आणि कुशल बद्रिकेने “मै आयी हू युपी बिहार लुटने” या गाण्यावर डान्स करत प्रेक्षकांसह उपस्थित सर्व कलाकारांचे निखळ मनोरंजन केले. सोबतच बाकीच्या कलाकारांनी देखील अनेक वेगवेगळे विनोदी स्किट सादर करत मनोरंजन करताना दिसले. मनोज वाजपेयी यांचे ‘चला हवा येऊ द्या’ च्या कलाकारांनी निखळ मनोरंजन केले.

मनोज बाजपेयी यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे शो मध्ये हजेरी लावली याचे कारण अस्पष्ट आहे. सोशल मीडियावर प्रेक्षकांनी त्या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com