Sara Ali Khan Visit Ujjain Mahakal Temple: चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर सारा पुन्हा एकदा उज्जैन मंदिरात, भक्तीत तल्लीन होताना व्हिडीओ व्हायरल...

Sara Ali Khan At Mahakal Temple: चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर सारा अली खानने नुकतीच मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेली आहे.
Sara Ali Khan Visit Ujjain Mahakal Temple
Sara Ali Khan Visit Ujjain Mahakal TempleInstagram
Published On

Sara Ali Khan At Mahakal:  ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. सारा अली खान आणि विकी कौशल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर सारा अली खानने नुकतीच मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेली आहे. यापूर्वी देखील ती अनेकदा मंदिरात गेल्यामुळे तुफान ट्रोल झाली होती. अनेकदा ट्रोल झाल्यानंतर देखील अभिनेत्री नुकतीच मंदिरात पाया पडण्यासाठी गेली होती. ती मंदिरात गेलेली अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Sara Ali Khan Visit Ujjain Mahakal Temple
The Kerala Story On OTT : सुदिप्तो सेनच्या 'द केरला स्टोरी'ची अडवणूक ; चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार नाही...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सारा अली खानने महाकाल मंदिराच्या गाभाऱ्यात संध्याकाळच्या आरतीला हजेरी लावली होती. मंदिरात अभिनेत्री धार्मिक विधी करताना दिसली. यानंतर ती कोटिकीर्थ कुंडातही गेली होती. २ जून रोजी प्रदर्शित झालेला त्यांचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केल्यानंतर अभिनेत्रीने मध्यप्रदेशातील महाकाल मंदिरात दर्शन घेतले.

Sara Ali Khan Ujjain
Sara Ali Khan Ujjain

व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये सारा अली खानने गुलाबी रंगाची साडी नेसली असून ती या लूकमध्ये फारच सुंदर दिसून येत आहे. डाव्या हातात गुलाबी रंगाच्या बांगड्या आणि डोक्यावर पल्लू घातलेली सारा अली खान खूपच सुंदर दिसत होती. यावेळी ती भक्तीत तल्लीन होताना देखील दिसली.

Sara Ali Khan Ujjain
Sara Ali Khan Ujjain
Sara Ali Khan Visit Ujjain Mahakal Temple
Dharmendra's Post For Alia Bhatt : धर्मेंद्र यांची आलिया भटसाठी खास पोस्ट; जुन्या आठवणींना उजाळा

सारा गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या प्रमोशनकरिता महाकाल मंदिरात गेली होती. त्यावेळी तिने एका मुलाखतीत होत असलेल्या ट्रोलिंगवर देखील भाष्य केले.

सारा म्हणते, “मी नेहमीच माझ्या कामाकडे खूप गंभीर पद्धतीने पाहते. मी माझ्या चाहत्यांसाठी काम करते. जर तुम्हाला माझं काम आवडत नसेल, तर साहाजिकच मला वाईट वाटेल. पण नेहमीच धार्मिक भावना माझ्यासाठी महत्वाची आहे. माझी धार्मिक श्रद्धा अजमेरच्या शरीफसाठी, बंगला साहेब किंवा महाकाल या सर्वांसाठीच सारखी धार्मिक भावना आणि श्रद्धा असेल. मी नेहमीच देवदर्शनासाठी जाईल, ट्रोलर्स मला काही बोलू दे कोणताच फरक पडणार नाही.”

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com