Sanjay Dutt Viral Video: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Bollywood Actor Sanjay Dutt) नेहमीच आपल्या अभिनयासाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. कधी अभिनयासाठी तर कधी त्याच्या फिटनेससाठी अनेकदा तो चर्चेत असतो. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता अभिनय क्षेत्रापासून जरी दुर असला तरी, तो अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असतो. सध्या ६३ वर्षीय संजय दत्तचा ‘देसी स्टाईल’मध्ये वर्कआऊट करणारा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सध्या तो वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये संजय दत्त उत्तम शरीरयष्टी ठेवण्यासाठी ‘देसी स्टाईल’मध्ये वर्कआऊट करत कुऱ्हाडीने लाकूड तोडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. संजय दत्तने कुऱ्हाडीने लाकूड तोडतानाचा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून अभिनेत्याचा वयाच्या ६३ व्या वर्षीही कशी फिटनेस आहे, याची चर्चा सुरू आहे.
अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करताना, कॅप्शनमध्ये सांगितले की, बॅक टू बेसिक, रॉ वर्कआऊट, लाकूड तोडणे हा व्यायाम करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. चांगला व्यायाम. हे चालू ठेवावे लागेल. एकदा आवश्य करून पहा. तुम्हाला हा व्यायाम नक्की आवडेल. #DuttsTheWay असा हॅशटॅग वापरत अभिनेत्याने त्याचा फिटनेस फंडा शेअर केला.
अभिनेत्याचा फिटनेस फंडा पाहून चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. सोबतच त्याच्या फिटनेसवर अनेक अभिनेत्यांनीही कमेंट केली. ‘सुपर भाजी’ अशी कमेंट राहुल देवने केली असून रिजवान सजनने ‘बाबा असं वाटतंय की, मान्यता सोबत आज खूपच भांडण झालंय.’ अशी कमेंट केली. अभिनेता नेहमीच आपल्या दमदार शरीरयष्टीसाठी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे.
संजय दत्तच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेता 90 च्या दशकात चित्रपटांमुळे खूपच प्रकाशझोतात होता. त्याने आपल्या चित्रपटांमध्ये अभिनेत्यासोबत एक उत्तम खलनायकाची भूमिका उत्कृष्ट पद्धतीने साकारले. संजयने केजीएफच्या दुसऱ्या भागातून टॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. अभिनेता त्यानंतर आता तामिळ पदार्पणासाठीही सज्ज झाला आहे. लिओमध्ये संजय थलपथी विजयसोबत खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. विजय थलपती आणि संजय दत्तचा आगामी चित्रपट येत्या १९ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्याच्या आगामी चित्रपटांसाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.