Mansi Naik Post: मानसी- तन्मयचा रोमँटिक अंदाजातील व्हिडीओ चर्चेत, म्हणते ‘तुमच्या मागणीनुसार...’

Mansi Naik Video: मानसीने नुकतंच एका रिल स्टारसोबत एक रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे.
Mansi Naik And Tanmay Patekarn Romantic Reel
Mansi Naik And Tanmay Patekarn Romantic ReelInstagram
Published On

Mansi Naik And Tanmay Patekarn Romantic Reel: प्रसिद्ध अभिनेत्री आणि आपल्या नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा आपल्यावर खिळवून ठेवणारी मानसी नाईक सध्या बरीच चर्चेत आहे. अभिनेत्री अनेकदा सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्यातील काही किस्स्यांमुळे चर्चेत आली. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा पती प्रदीप खरेरासोबत घटस्फोट झाला होता. अनेकदा तिने सोशल मीडियावर तिच्या प्रेमाविषयी काही खास पोस्ट्स शेअर केल्या आहेत. अशातच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून अभिनेत्रीने चाहत्यांचे लक्ष वेधलेय.

Mansi Naik And Tanmay Patekarn Romantic Reel
Rashmika- Vijay Wedding News : रश्मिका आणि विजय लवकरच लग्न करणार? कुटुंबियांसोबतचा VIDEO व्हायरल पाहा

अनेकदा मराठी सेलिब्रिटी काही रिल स्टारसोबत व्हिडीओ बनवताना दिसत आहेत. सध्या त्यांच्या व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान चर्चेत आले आहे. नुकतंच मानसीने ही एका रिल स्टारसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडिया स्टार तन्मय पाटेकरसोबत एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी मानसी नाईक बॅकग्राऊंड गाण्यामुळे आणि कॅप्शनमुळे हा व्हिडीओ चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.

मानसी आणि तन्मयने नुकताच एक रोमँटिक व्हिडीओ शूट केला आहे. या रोमँटिक व्हिडीओत मानसी त्याला मुलींना मिठीत कसं घ्यायचं याचं प्रशिक्षण देताना दिसत आहे. व्हिडीओत तन्मय मानसीला प्रत्यक्षात फिल्मी अंदाजात मिठीत कसं घ्यायचं हे दाखवतो. यावेळी व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला पहिल्यांदा एक इंग्रजी गाणं लागतं आणि त्यानंतर एक ‘मला वेड लागले प्रेमाचे’ हे गाणं लागतं. यावेळी व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये “तुमच्या मागणीनुसार आम्ही एकत्र रिल केला. आम्हाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहात का?” अशा आशयाचं कॅप्शन देत व्हिडीओ शेअर केला. सध्या या दोघांचाही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Mansi Naik And Tanmay Patekarn Romantic Reel
Aai Kuthe Kay Karte Update : अरुंधती-आशुतोषमध्ये येणार दुरावा ? वीणाच्या मदतीने अनिरुद्ध खेळतोय नवी खेळी

मानसी आणि तन्मयच्या या रोमँटिक रिलवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. या रिलवर चाहते म्हणतात, “नशिब काढलंस पोरा”. तर आणखी एक म्हणतो, “ही जोडी आयुष्यभर जर साथ राहिली तर खूप चांगलं होईल.” तर आणखी एक म्हणतो, “भविष्यात भारतातील मराठी चित्रपट निर्माते तू असणार आहेस मित्रा, पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा”, “क्या बात है, तुम्हाला एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहे.” अशा आशयाच्या कमेंटच्या माध्यमातून चाहत्यांनी दोघांवरही कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Mansi Naik And Tanmay Patekarn Romantic Reel
Rocky Aur Rani Ki Prem Kahani बिग बजेट चित्रपटातील कलाकरांचे मानधनही आहे बक्कळ; आकडा पाहून थक्क व्हाल

सोशल मीडिया स्टार तन्मय पाटेकरबद्दल बोलायचे तर, तो नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावर अनेकदा तन्मय मराठी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींसोबत तो व्हिडीओ शेअर करत असतो. सोबतच तो चाहत्यांसाठी नेहमीच वेगवेगळ्या आशयाच्या व्हिडीओ शेअर करत असतो. तर मानसीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, मानसी ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या दोन गाण्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक प्रकाश झोतात आली. ‘एकदम कडक’ या चित्रपटाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com