Aryan Khan Bribery Case: CBI नोंदवणार शाहरूख खान, आर्यन खानचा जबाब, नेमकं प्रकरण काय?

CBI May Record Statements of Shah Rukh, Aryan: सीबीआय खान पिता-पुत्रांचे जबाब नोंदवण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती सीबीआयच्या सुत्रांनी दिलेली आहे.
Shah Rukh And Aryan Khan
Shah Rukh And Aryan KhanSaam Tv
Published On

Aryan Khan Case: सीबीआयचे माजी झोनल अधिकारी समिर वानखेडे (Sameer Wankhede) कथित खंडणी भ्रष्टाचार प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. याप्रकरणी सीबीआय (CBI) आता बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान (Actor Shah Rukh Khan) आणि त्याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) यांचे जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. याप्रकरणाच्या तपासात सीबीआयने आतापर्यंत अनेक जणांचे जबाब नोंदवले आहेत. आता सीबआय खान पिता-पुत्रांचे जबाब नोंदवण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती सीबीआयच्या सुत्रांनी दिलेली आहे.

Shah Rukh And Aryan Khan
‘Dabangg 3’ Actress Hema Sharma Claims: ‘दबंग ३’ फेम अभिनेत्रीचे सलमानच्या सुरक्षा रक्षकांवर गंभीर आरोप; म्हणाली, ‘श्वानासारखे बाहेर...’

मिळालेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे कथित खंडणी भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरु आहे. याप्रकरणात सीबीआयने आतापर्यंत अनेक जणांचे जबाब नोंदवले आहेत. आता याप्रकरणात सीबीआय शाहरुख खान आणि आर्यन खानचा जबाब नोंदवण्याच्या तयारीमध्ये आहेत. या दोघांचे जबाब नोंदवल्यानंतर समीर वानखेडे यांच्यावर लावलेल्या खंडणींच्या आरोपांबाबत अधिक स्पष्टता येईल अशी माहिती समोर येत आहे. त्यांचा जबाब नोंदवण्याची तारीख आणि वेळ अद्याप निश्चित झालेली नाही. पण लवकरच त्यांचा जबाब नोंदवला जाईल असे सांगण्यात येत आहे.

Shah Rukh And Aryan Khan
Asit Modi Reacts: गुन्हा दाखल झाल्यानंतर ‘तारक मेहता का...’ निर्मात्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘सध्या पोलीसांकडून...’

समीर वानखेडे आणि इतर काही जणांनी मिळून आर्यन खानकडे 25 कोटींची मागणी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने वानखेडेंविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते. याप्रकरणी सीबीआयने समीर वानखेडे यांच्या गोरेगाव येथील घरावर छापा देखील टाकला होता. तसंच सीबीआयने समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांचे मोबाईल जप्त केले होते. याप्रकरणात खासगी व्यक्तीमार्फत रोख रकमेची मागणी केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यांनी 25 कोटीची मागणी करून 50 लाख रुपये घेतल्याचा आहे आरोप आहे. हे पैसे त्यांनी नंतर परत केल्याचे देखील समोर आले आहे.

Shah Rukh And Aryan Khan
Mukesh Khanna On Saif Ali Khan: ‘सैफ रावण नाहीतर...’ ‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्नांचे आदिपुरूषवर टीकास्त्र

समीर वानखेडे यांनी सीबीआयच्या समन्सविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. पण दिल्ली हायकोर्टाकडून त्यांना कोणताही दिलासा मिळाला नव्हता. दिल्ली हायकोर्टाने त्यांना 'तुम्ही मुंबई हायकोर्टात जाऊ शकता.', असा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मुंबई हायकोर्टाने त्यांना दिलासा देत सीबीआयला चौकशी होत नाही तोपर्यंत अटक करु नका असे निर्देश दिले होते. त्याचसोबत मुंबई हायकोर्टान त्यांना कोर्टाचे संरक्षण दिले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com