Salman Khan
Salman KhanSAAM TV

Salman Khan: दिलदार टायगर! सलमानने फक्त १ रूपयात केला चित्रपट, अनेक अभिनेत्यानं ऑफर केली होती रिजेक्ट, पण...

Salman Khan: सलमान खान सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक आहे. पण त्याने एका चित्रपटात फक्त १ रुपया मानधन घेऊन केले होते. हा चित्रपट बी-टाउनच्या अनेक मोठ्या स्टार्सनी नाकारला होता.
Published on

Salman Khan: जेव्हा एखादा स्टार त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर असतो तेव्हा ते प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक ठाकतात. ते चित्रपट काळजीपूर्वक निवडतात जेणेकरून कोणतीही भूमिका त्यांच्यासाठी टाइपकास्ट बनू नये. तथापि, काही कलाकार जोखीम घेण्यास घाबरत नाहीत. सलमान खान देखील हा असाच एक अभिनेता आहे.

सलमान खानने पडद्यावर अनेक भूमिका साकारल्या आहेत. आज तो बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. त्याच्या कारकिर्दीत त्याने अशा भूमिका साकारल्या आहेत ज्या काही स्टार्स घेण्यापूर्वी दोनदा विचार करतील. तुम्हाला कदाचित माहित नसेल की या अभिनेत्याचा एक चित्रपट होता जो अनेक मोठ्या बॉलिवूड स्टार्सनी नाकारला होता.

सलमान खानची आव्हानात्मक भूमिका

हा चित्रपट होता फिर मिलेंगे. रेवती दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान, शिल्पा शेट्टी आणि अभिषेक बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. ही कथा तमन्ना (शिल्पा) भोवती फिरते, जी रोहित (सलमान) सोबतच्या वन-नाईट स्टँडनंतर एचआयव्ही पॉझिटिव्ह होते. जेव्हा तिच्या कंपनीला हे कळते तेव्हा तिला कामावरून काढून टाकले जाते. त्यानंतर ती तिच्या माजी सहकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करते.

Salman Khan
Amitabh Bachchan: 'बायकोला दररोज खोटे बोलावे लागतं'; अमिताभ बच्चनचा KBC वर मजेशीर खुलासा, पाहा व्हिडिओ

अनेक स्टार्सनी चित्रपट नाकारला

'फिर मिलेंगे' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला नसला तरी समीक्षकांनी त्याचे खूप कौतुक केले. या चित्रपटात सलमान खानचेही खूप कौतुक झाले. पण, या भूमिकेसाठी तो कधीच पहिली पसंती नव्हता. निर्माते शैलेंद्र सिंग यांनी एकदा खुलासा केला की त्यांनी या भूमिकेसाठी अनेक कलाकारांचा विचार केला होता, परंतु सर्वांनी तो नाकारला.

Salman Khan
Bigg Boss Marathi: दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार! रितेश भाऊच्या बिग बॉसचा नवा प्रोमो चर्चेत

सलमान खानने किती पैसे घेतले?

अशा विषयाला कोणीही स्पर्श करू इच्छित नव्हते. त्यावेळी फक्त सलमान खाननेच हा चित्रपट करण्यास होकार दिला होता. एचआयव्हीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी त्याने ही भूमिका केली होती. विशेष म्हणजे, या चित्रपटासाठी अभिनेताने फक्त एक रुपया मानधन घेतलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com