
Salman Khan: चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा बॉलिवूडचा भाईजान सलमान खान ५९ वर्षांचा आहे, पण त्याने अजून लग्न केलेले नाही. त्याचे अनेक चाहते त्याला अनेकदा विचारत असतात की तो लग्न कधी करणार. आता त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो घटस्फोट आणि पोटगीच्या रकमेबद्दल बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मधील आहे, जो शो रिलीज होण्यापूर्वीच व्हायरल झाला होता.
खरं तर, २१ जूनपासून कॉमेडियन कपिल शर्मा नेटफ्लिक्सवर 'द ग्रेट इंडियन कपिल शो' चा तिसरा सीझन घेऊन येणार आहे. या शोमध्ये सलमान खान पहिला पाहुणा असेल. चाहते या एपिसोडसाठी खूप उत्सुक आहेत, कारण सलमान जेव्हा जेव्हा कपिलच्या शोमध्ये येतो तेव्हा त्याने खूप किस्से सांगितले आहेत.
शोमधून समोर आलेल्या सलमान खानच्या व्हिडिओमध्ये तो घटस्फोट आणि पोटगीच्या रकमेवर मस्करी करतो आणि म्हणतो, "घटस्फोट एका छोट्या गैरसमजातून होतो. आणि मग ती घटस्फोट घेते एवढचं नाही तर, ती अर्धे पैसे घेऊनही निघून जाते." सलमानकडून हे ऐकून कपिल शर्मा, अर्चना पूरण सिंग तसेच प्रेक्षकांमध्ये बसलेले लोकही हसायला लागतात.
कपिल शर्माच्या शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धू देखील दिसणार आहेत
राजकारणी आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू पूर्वी कपिलच्या शोमध्ये जज म्हणून दिसायचे. मात्र, २०१९ मध्ये त्यांनी शो सोडला. त्यांची जागा अर्चना पूरण सिंग यांनी घेतली. मात्र, सिद्धू पुन्हा एकदा या शोमध्ये परतणार आहेत. आता शोमध्ये एक नाही तर दोन जज असतील. अर्चना पूरण सिंग आणि सिद्धू दोघेही जजच्या खुर्चीवर दिसतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.