Sohail Khan : अरबाजनंतर सोहेल खान प्रेमात? सोबत दिसणारी मिस्ट्री गर्ल कोण?

Sohail Khan With Mystery Girl : सोहेल खान एका मुलीसोबत स्पॉट झाला. यामुळे तो पुन्हा एकदा प्रेमात पडल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सोहेलची ही मिस्ट्री गर्ल कोण?
Sohail Khan With Mystery Girl
Sohail KhanSAAM TV
Published On

सलमान खानचा (Salman Khan) भाऊ अभिनेता सोहेल खानने 1998 मध्ये सीमा सजदेहसोबत लग्न केले. पण त्यांचे लग्न 24 वर्षानंतर तुटले. आता सोहेल खान गर्लफ्रेंडसोबत डिनर डेटला गेल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. अभिनेता सोहेल खान (Sohail Khan) सोमवारी रात्री उशिरा गर्लफ्रेंड सोबत डिनर डेटला गेला असता, रेस्टॉरंटबाहेर त्या दोघांना स्पॉट केले गेले.

सोहेलच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये, एका मुलीसोबत दिसला. सोहेल खान मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून आपल्या मिस्ट्री गर्लसोबत बाहेर पडताना दिसला. रेस्टॉरंटबाहेर त्यांना पॅप्सनी स्पॉट केले. मात्र सोहेल मीडियाशी संवाद न करता कारमध्ये बसून तिथून निघून गेला. तेव्हा त्याच्या सोबत एक मुलगी दिसली. सोहेलच्या कारमध्ये मागे बसलेल्या मिस्ट्री गर्लनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. जी त्याची गर्लफ्रेंड असल्याचे बोले जात आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा त्यांनी केली नाही. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या अनेक कमेंट्स येताना दिसत आहेत. एका युजरने तर 'म्हातारपणात त्याला मैत्रीण कशी मिळते?' अशी कमेंट केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते ही मुलगी कोण आहे? हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत.

भाईजानचा भाऊ सोहेल खानच्या आयुष्यात 54 वर्षी प्रेमाने पुन्हा दार ठोठावले. बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता सोहेल खानचा सीमा सजदेह सोबत घटस्फोट झाला आहे. त्याला दोन मुलं देखील आहेत. मात्र दोघही आई-वडील एकत्र आपल्या मुलांची निर्वाण आणि योहानची काळजी घेत आहेत.

Sohail Khan With Mystery Girl
Deepika Padukone : दीपिकाच्या मुलीचं रणबीर कपूरसोबत यूजर्सने जोडलं कनेक्शन, वाचा नेटकरी काय म्हणतात?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com