Bichadna New Song: ‘सैयारा’ फेम फहीम अब्दुल्ला याने भूषण कुमार आणि टी-सिरीजसोबत 'बिछडणं' एक सशक्त, थेट आणि भावनांनी भरलेलं नविन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. हे गाणं हरवलेल्या प्रेमाचं दुःख व्यक्त करतं. आदिल झफर खान आणि रीम शेख यांची या गाण्यात प्रमुख भूमिका असून हे गीतं प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणेल.
हार्ड रॉकच्या अंगाने जाणारी कंपोझिशन, फहीमचा आवाज आणि संगीत तुमचं लक्ष शेवटच्या ओळीपर्यंत खिळवून ठेवतो. प्रत्येक ओळीत आणि सुरात आयुष्याचं एक खरं क्षण उमटलेलं जाणवतं. ट्रू मेकर्सच्या दिग्दर्शनात, व्हिडिओ दोन जन्मांतील प्रेमकथेचा प्रवास दाखवतो. प्रेम आणि विरहाच्या सीमारेषांवरची एक थरारक सफर. आदिल झफर खान आणि रीम शेख यांचं सशक्त सादरीकरण मनाला भिडतं.
फहीम अब्दुल्ला म्हणाला, बिछडणं’ खूप अस्थिर आणि भावना भरलेल्या अवस्थेतून जन्मलेलं गाणं आहे. सगळं एका जाममध्ये घडलं. हे थांबवायचंच नव्हतं. भूषण सर आणि टी-सिरीजचे मनापासून आभार की त्यांनी याला पूर्ण मोकळीक दिली.”
संगीतकार अमीर यांचे शब्द मनावर खोलवर परिणाम करतात. अशा भावना जागृत करतात ज्या बर्याचदा न सांगितलेल्या राहतात. ‘बिछडणं’ सध्या टी-सिरीजच्या यूट्यूब चॅनेलवर आणि सर्व प्रमुख म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे.