Saif Ali Khan : 'माझ्याचुकीमुळे माझ्यावर हल्ला...'; सैफ अली खानने २५ दिवसानंतर सांगितला 'त्या' रात्रीचा थरार

Saif Ali Khan First Interview After Knife Attack : सैफ अली खानवरील चाकू हल्ल्यानंतर त्याची पहिली मुलाखत समोर आली आहे. या मुलाखतीत त्याने त्या रात्री घडलेली संपूर्ण घटना सांगितली आहे.
saif ali khan
saif ali khanGoogle
Published On

Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान वर झालेला हल्ला हा 'खरा' हल्ला होता का? एखाद्या सेलिब्रिटीच्या घरात कोणी असे कसे घुसू शकत का? सैफला रीक्षाची गरज का पडली? सैफ खरोखर तैमूरसोबत गेला होता का? पाठीत चाकू अडकून तो लगेच कसा एवढा बारा झाला ?

सैफ अली खानला नक्कीच पाठिंबा आणि सहानुभूती मिळाली, पण त्याच्यासोबत झालेल्या हल्ल्यानंतर तो लगेच कसा बरा झाला आणि काम करू लागला यांसारखे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत. सैफने हल्ल्यानंतर दिलेल्या पहिल्या मुलाखतीत, सैफ त्याच्या हितचिंतकांचे आभार मानतो त्यारात्री घडलेला सगळा प्रकार उघडपणे सांगितला आहे.

saif ali khan
GauriShankar: प्रेमात हरला नाही, प्रतिशोधाने थांबला नाही; धडाकेबाज ॲक्शन असलेल्या 'गौरीशंकर' चित्रपटाचा टीजर Out

करीना जेवणासाठी बाहेर गेली होती आणि सकाळी माझे काही काम होते, म्हणून मी घरातच राहिलो. ती परत आली, आम्ही गप्पा मारल्या आणि झोपी गेलो. थोड्या वेळाने, घरकाम करणारी महिला धावत आली आणि म्हणाली - 'घरात कोणीतरी घुसलं आहे' जेहच्या खोलीत एक माणूस चाकू घेऊन पैसे मागत आहे!’ रात्रीचे २ वाजले होते, म्हणून मी तडक जेहच्या खोलीच्या दिशेने गेलो.

saif ali khan
Shivali Parab Reel: 'सुबह से शाम तक...'; कल्याणची चुलबुली पडली श्रमेषच्या प्रेमात? व्हिडीओ व्हायरल

मी पाहिले की एक माणूस जेहच्या बेडवर उभा होता आणि त्याच्या हातात दोन चाकू होते. ते एक भयानक दृश्य होते. हळू हळू पुढे जाऊन मी त्याला पकडले. मी धावत जाऊन त्याला बेडवरुन खाली खेचले आणि मग आमच्यात थोडी मारामारी झाली. तो माझ्या पाठीवर शक्य तितक्या जोरात मारत होता.

saif ali khan
Saif Ali Khan : जीवघेण्या हल्ल्यानंतर तैमूर म्हणाला, "बाबा तू मरणार नाहीस ना? " सैफनं सांगितला 'त्या' रात्रीचा घटनाक्रम

त्या मारामारीत मला कळले नाही की माझ्या मानेत चाकू घुसला आहे. कारण त्या क्षणी मला माझ्या मुलाची खूप जास्त काळजी वाटत होती. तो माझ्या मानेवर वार करत होता आणि मी माझ्या हाताने ते रोखत होतो. माझ्या तळहाताव मनगटावर आणि हातावर त्याने वार केले. पण हळू हळू मी त्याला थांबवू शकलो नाही.

मी फक्त प्रार्थना करत होतो की कोणीतरी या माणसाला माझ्यापासून दूर करू शकेल. तेवढ्यात माझ्या घरात घरकाम करणाऱ्या गीताने त्याला माझ्यापासून दूर ढकलले आणि आम्ही दोघांनी त्याला दूर लोटले आणि दार बंद केला. 'माझ्यावरील झालेल्या या हल्ल्याला मीच जबाबदार आहे. माझ्या घराची दार नीट बंद आहेत का याकडे माझं लक्ष नव्हतं. मी सोसायटी,पोलीस किंवा इतर कुणालाही दोष देत नाही. माझ्याबाबतीत असं काही घडेल याची मी कधीच कल्पनाही केली नव्हती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com