SS Rajamouli On Mohenjodaro: पाकिस्तानच्या आडकाठीमुळे राजामौलींच्या स्वप्न अपुरं...

SS Rajamouli Wants To Make A Film On Mohenjodaro: दिग्दर्शक एस एस राजामौलींना पाकिस्तानातील संस्कृतीवर एक चित्रपट बनवायचा होता, पण पाकिस्तान सरकारने त्यांच्या चित्रपटाची परवानगी नाकारली असल्याने त्यामुळे त्याचं खुळ त्यांना सोडून द्यावं लागलं होतं.
SS Rajamouli Wants To Make A Film On Mohenjodaro
SS Rajamouli Wants To Make A Film On MohenjodaroInstagram
Published On

SS Rajamouli Film: दाक्षिणात्य चित्रपटाचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली(SS Rajamouli) ‘आरआरआर’ चित्रपटामुळे नेहमीच चर्चेत राहिलेलं नाव. त्यांनी भारतीय सिनेसृष्टीला आतापर्यंत अनेक बिगबजेट चित्रपट दिले आहेत. ‘बाहुबली’च्या सीरिजचे दिग्दर्शन करणारे आणि ‘आरआरआर’चे दिग्दर्शन करणाऱ्या एस एस राजामौलींनी २००९ मध्ये ‘मगधीरा’ नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, त्यांच्या इतर चित्रपटांप्रमाणे राजामौलींचा हा चित्रपट देखील चांगलाच हिट झाला. या चित्रपटाची कथा देखील इतिहासकालीन कथेवर आधारित होती.

चित्रपटासाठी एस एस राजामौली पाकिस्तानात गेले होते. दिग्दर्शकांना पाकिस्तानातील संस्कृतीवर एक चित्रपट बनवायचा होता, पण पाकिस्तान सरकारने त्यांच्या चित्रपटाची परवानगी नाकारली असल्याने त्यामुळे त्याचं खुळ त्यांना सोडून द्यावं लागलं होतं. आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर दिग्दर्शकाला खास आवाहन केल्यावर राजामौलींनी हा किस्सा सांगितला आहे.

SS Rajamouli Wants To Make A Film On Mohenjodaro
Shreyas Talpade At Hutatma Chowk: तू आहेस म्हणून मी आहे… श्रेयस तळपदेने महाराष्ट्रदिनी व्यक्त केली भावना

सध्या सर्वच जण राजामौलींच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच राजामौलींनी चित्रपटाबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. तो खुलासा ऐकून सर्वांचीच काही वेळेसाठी तरी का होईना निराशा झाली आहे.

खरं तर राजामौलींना भारतातील प्राचीन संस्कृतींपैकी एक सिंधू संस्कृतीवर चित्रपट बनवायचा होता, पण पाकिस्तानने त्यांचे स्वप्न पूर्ण होऊन दिले नाही. आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हडप्पा काळातील एक फोटो शेअर केला असून एसएस राजामौली यांना त्यावर चित्रपट बनवण्याचे आवाहन केले, त्यावर राजामौलींनी उत्तर देत पाकिस्तान संबंधित एक किस्सा सांगितलाय. (Tollywood)

SS Rajamouli Wants To Make A Film On Mohenjodaro
Sharad Pawar Watched Maharashtra Shaheer: शरद पवारांनी ‘महाराष्ट्र शाहीर’ पाहिला; म्हणतात ‘शेवटचं गाणं सुरु झालं आणि अंकुशला...’

आनंद महिंद्रा राजामौलींना ट्वीट करत म्हणतात, ‘तुम्ही या सर्वात प्राचीन संस्कृतीवर एक सिनेमा बनवायला हवा, ज्यामुळे या प्राचीन सभ्यतेविषयी आपल्या लोकांना माहिती मिळेल.’

आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटला उत्तर देत राजामौली म्हणतात, ‘नक्कीच सर. गुजरातमधील धोलावीरा येथे ‘मगधिरा’ चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं. शूटिंग दरम्यान मला तिथे एक झाड दिसलं, जे फारच प्राचीन काळातील होतं आणि फार जुनं ही होतं. त्यावेळी मी सिंधू संस्कृतीवर चित्रपट बनवायचा विचार केला. काही काळानंतर मी चित्रपटासाठी पाकिस्तानातही गेलो होतो, त्यावेळी पाकिस्तानात असताना मोहेंजोदारोला जाऊन भेट द्यायचा ही प्रयत्न केला, पण त्यावेळी मला पाकिस्तान सरकारकडून परवानगी मिळाली नाही.’

पाकिस्तानातील मोहेंजोदारो हे वर्ल्ड हेरिटेज साईट (जागतिक वारसा स्थळ) असून पाकिस्तानातील सिंधू नदी काठी ते ठिकाण आहे. त्या ठिकाणी सिंधू संस्कृतीचे अवशेष आहेत. गेल्या काही काळात पाकिस्तानात झालेल्या अतिवृष्टीमुळे इथला बराच भाग खचल्याने या परिसरात पर्यटकांना येण्यासाठी बंदी घातली आहे.

राजामौलींनी या प्राचीन सभ्यतेवर चित्रपट बनवला तर तो चित्रपट खरोखरच अद्भुत आणि खूप काही जाणून घेण्याची संधी प्राप्त करून देईल, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. मात्र, आशुतोष गोवारीकर यांनी बॉलिवूडमध्ये याआधीच एक पिरियड मूव्ही बनवला असून ज्यात या प्राचीन सभ्यतेची झलक पाहायला मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com