
Sharad Pawar Watched Maharashtra Shaheer Cinema: केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाची सध्या अवघ्या महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. चित्रपटाची घोषणा होताच चित्रपटाची अवघ्या महाराष्ट्रात चर्चा होत आहे. शाहीर साबळे यांच्या जीवनपटात त्यांच्या आयुष्यातील आणि व्यक्तिमत्वातील महत्वाचे पैलू उलगडून दाखवले आहेत. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसोबत पत्नी प्रतिभा पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा चित्रपट पाहिला आहे.
‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट पाहण्यासाठी यावेळी शरद पवार आणि त्यांची पत्नी यांनी ३० एप्रिल रोजी अर्थात रविवारी चित्रपट पाहिला. शरद पवार यांनी चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटाबाबत प्रतिक्रिया दिलीय. शरद पवार व त्यांच्या पत्नी यांनी महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचं आणि चित्रपटाच्या टीमचं तोंड भरून कौतुक करत शुभेच्छा दिल्या. चित्रपट पाहिल्यानंतर अंकुश चौधरीचं आणि त्याच्या अभिनयाचं शरद पवार यांनी तोंडभरून कौतुक केलं.
शरद पवार चित्रपटाचं आणि चित्रपटाच्या टीमचं कौतुक करत म्हणतात, “शेवटचं गाणं सुरु झालं आणि मी अंकुशला पूर्णतः विसरून गेलो. मला फक्त शाहीर साबळे दिसले.” असं म्हणत अंकुश चौधरीचं आणि त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. खास शरद पवार यांच्यासाठी खास चित्रपटाच्या शो चं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी NFDC सेंटर येथे शरद पवारांसोबत पत्नी प्रतिभा पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड सुद्धा उपस्थित होते. चित्रपट पाहिल्यानंतर शरद पवार यांनी चित्रपटाच्या टीमची खास भेट घेत सर्वांसोबत मनमोकळेपणाने संवाद साधला. (Marathi Film)
चित्रपटाचं बजेट एकूण ७ कोटींच्या घरात असून हा चित्रपट १० कोटींपर्यंत गल्ला जमवेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे गेले महिनाभर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा असलेला महाराष्ट्र शाहीर चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कमाई करतोय? याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.