

Marathi Movie Ved's First Look: रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा हे महाराष्ट्राचीच नाही तर संपूर्ण देशाची लाडकी जोडी आहे. सोशल मीडियावर दोघेही अनेक विनोदी व्हिडिओ शेअर करत असतात. व्हिडिओद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या जोडीला चित्रपटामध्ये पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा आहे. प्रेक्षकांची ही इच्छा रितेश आणि जेनेलिया लवकरच पूर्ण करताना दिसणार आहेत. तब्बल १० वर्षांनी ही जोडी पुन्हा एकदा चित्रपटामध्ये झळकणार आहे.
रितेश आणि जेनेलिया यांनी बरेच वर्ष एकत्र काम केले नव्हते. पण आता ही जोडी आपल्याला रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. रितेश आणि जेनेलिया एका मराठी चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहेत. 'वेड' असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जेनेलिया मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. (Movie)
रितेश देशमुख याने याच्या इंस्टाग्रामवर या चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. "वेडेपणा करायला मुहूर्त नसतो पण केलेला वेडेपणा एखाद्या मुहूर्तावर जाहिर करायला काय हरकत आहे! आज दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छांसकट सादर करतोय तारिख आणि चित्रपटाचा फर्स्ट लुक.आमचं #वेड तुमच्यापर्यंत येतंय ३० डिसेंबरला", असे कॅप्शन रितेशने या पोस्ट दिले आहे. (Riteish Deshmukh)
जेनेलियाने सुद्धा तिच्या ट्विटर हॅन्डलवरून 'वेड' या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. तिने पोस्ट करत लिहिले आहे की, "माझा जन्म महाराष्ट्रातलाच.मी अभिनयाला सुरवात केल्यानंतर हिंदी-तमिळ-तेलगू अशा विविध भाषांमधून चित्रपट केले.तिथे रसिक प्रेक्षकांचं उदंड प्रेम मला मिळालं. रितेशच्या पहिल्या दिग्दर्शनाद्वारे मी मराठीत चित्रपटात पदार्पण करतेय. मराठीत काम करतांना मला एक वर्तूळ पूर्ण झाल्यासारखं वाटतंय." (Twitter)
'वेड' या चित्रपटातून अभिनेत्री म्हणून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी जेनेलिया या सुद्धा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन खुद्द रितेश देशमुख करता आहेत. या चित्रपटाला अजय-अतुल यांचे संगीत असणार आहे. हा चित्रपट ३० डिसेंबर, २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.