Singers Father Passes Away: जगप्रसिद्ध गायिका आणि उद्योजिका रिहानावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिचे वडील, रोनाल्ड फेंटी, यांचे वयाच्या ७०व्या वर्षी लॉस एंजेलिसमध्ये निधन झाले. संपूर्ण कुटुंब या दुःखद प्रसंगात एकत्र आले असून, रिहानाने अद्याप या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
रोनाल्ड फेंटी काही काळापासून आजारी होते, मात्र त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. Starcom Network या बार्बाडोसमधील रेडिओ स्टेशनने त्यांच्या निधनाची बातमी सर्वप्रथम दिली. रिहानाचा भाऊ, राजाद फेंटी, सेडर्स-सिनाई मेडिकल सेंटरमध्ये वडिलांची भेट घेताना दिसला होता. रिहाना देखील त्याच वाहनात असल्याचे सांगितले जाते, परंतु तिचे फोटो समोर आलेले नाहीत.
रिहाना आणि तिच्या वडिलांमधील संबंध अनेक वर्षे तणावपूर्ण होते. रोनाल्ड फेंटी यांच्या मद्यपान आणि अमली पदार्थांच्या व्यसनामुळे त्यांच्या कुटुंबात अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. रिहानाने २०१९ मध्ये वडिलांविरुद्ध तिच्या नावाचा गैरवापर केल्याचा आरोप करत न्यायालयात खटला दाखल केला होता. मात्र, २०२१ मध्ये हा खटला मागे घेण्यात आला आणि त्यानंतर दोघांमध्ये संबंध सुधारले.
रोनाल्ड फेंटी यांनी रिहानाच्या आई होणार असल्यावर आनंद व्यक्त केला होता. त्यांनी रिहानाच्या मुलासोबत वेळ घालवण्याची इच्छा व्यक्त केली होती. रिहाना सध्या तिच्या तिसऱ्या बाळाच्या प्रतिक्षेत आहे. या दुःखद प्रसंगात, रिहानाच्या चाहत्यांनी आणि जगभरातील लोकांनी तिला आणि तिच्या कुटुंबाला धीर दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.