The Kapil Sharma Show मध्ये रवीना टंडनने उडवली कपिलची खिल्ली: व्हिडिओ व्हायरल

Raveena Tandon In Kapil Sharma Show: पीएम मोदींचा रेडिओ शो 'मन की बात'च्या 100 व्या भागात सहभागी झाल्यानंतर रवीना टंडन 'द कपिल शर्मा शो'मध्ये येणार आहे.
Raveena Tandon In Kapil Sharma Show
Raveena Tandon In Kapil Sharma ShowSaam TV

Raveena plants a kiss on Kapil's cheeks: 'द कपिल शर्मा शो'मध्ये अनेक कलाकार आणि दिग्गज उपस्थित राहतात. नुकताच या शोच्या आगामी भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या वीकेंडला 'द कपिल शर्मा शो'मध्ये सुद्धा मूर्ती, रवीना टंडन आणि गुनीत मोंगा सहभागी झाल्या आहेत. दरम्यान या रवीना टंडन तिच्या जुन्या भूमिकांची आठवण झाली. अंदाज अपना अपना या चित्रपटाविषयी रवीना बोलत होती.

पीएम मोदींचा रेडिओ शो 'मन की बात'च्या 100 व्या भागात सहभागी झाल्यानंतर, रवीना टंडन या आठवड्यातील भागात 'द कपिल शर्मा शो'मध्ये पाहुनी म्ह्णून येणार आहे. सोनी टीव्हीने त्यांच्या सोशल मीडियावर या शोचा प्रोमो शेअर केले आहे. या प्रोमोमध्ये रवीना 'अंदाज अपना अपना'मधील तिच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगताना म्हणाली, 'अंदाज अपना अपना'मध्ये मी कुरळे केस का घातले, असा प्रश्न मला पडतो. (Latest Entertainment News)

निर्मात्यांनी शेअर केलेल्या प्रोमोमध्ये रवीना म्हणतेय, 'अंदाज अपना अपनामध्ये माझे केस कुरळे का होते? तुम्ही या गोष्टींबद्दल नंतर विचार करता आणि तुम्ही त्यामध्ये सुधारणा करायला हवी होती का याबद्दल विचार करता.

Raveena Tandon In Kapil Sharma Show
Actress Spoke About Casting Couch: या प्रकारामुळे निश्चितच त्रास होतो... नाळ मधील प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने कास्टिंग काऊचंवर मांडले मत

रवीना हा किस्सा सांगताच कपिलने त्यावर कमेंट केली. रवीनाला होकार देत कपिल म्हणाला, 'कोणीही जुने फोटो पाहिले, तर आपल्याला आपल्या फॅशनच्या निवडीवर प्रश्न पडतोच.' यानंतर रवीना गंमतीने कपिलला टोमणा मारत आणि म्हणाली, 'तुझे आताचे फोटो पाहून तू असाच विचार करत असशील.' रवीनाचे हे बोलणे ऐकून सगळे जोरजोरात हसायला लागतात.

रवीना टंडनने कपिलची खिल्ली उडवल्यानंतर ती सोफ्यावरून उठते आणि कपिलच्या गालावर किस करते. त्यावर कपिल खूप गंमतीशीर उत्तर देतो. कपिल म्हणतो, 'जर अपमान झाल्यावर असं काही होत असेल तर मी ३-४ वेळा अपमानित व्हायला तयार आहे.'

'द कपिल शर्मा शो'चा हा प्रोमो पाहून चाहत्यांना या शोमध्ये आणखी काय होणार याची उत्सुकता लागली आहे. रवीनाची फनी स्टाइल सगळ्यांनाच आवडली आहे. चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, 'अंदाज अपना अपना' हा रवीना टंडनच्या करिअरमधील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे.

1994 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. राजकुमार संतोषी दिग्दर्शित या चित्रपटात आमिर खान, सलमान खान, करिश्मा कपूर, शक्ती कपूर आणि परेश रावल यांनीही प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

रवीना टंडनच्या 'KGF 2' मध्ये एका राजकीय भूमिकेत दिसली होती. रवीना आगामी रोमँटिक-कॉमेडी चित्रपट 'घुडछडी' मध्ये संजय दत्त, पार्थ समथान आणि खुशाली कुमार यांच्यासोबत दिसणार आहे. यासोबतच त्यांचा 'पटना शुक्ल' देखील आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com