Ranveer Singh Dhurandhar: 'धुरंधर'मधील रणवीर सिंहचा खास लूक पाहिलात का? सेटवरचा फोटो लीक

Ranveer Singh New Movie: रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटातील चार वेगवेगळे लूक सोशल मीडियावर लीक झाले आहेत. अ‍ॅक्शन, करिष्मा आणि जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन असलेले हे फोटो सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.
Ranveer Singh Dhurandhar
Ranveer Singh leaked photossaam tv
Published On

रणवीर सिंग हा भारताचा सगळ्यात प्रसिद्ध अभिनेता आहे. अफाट टॅलेंट, भावनिक खोली आणि प्रत्येक भूमिकेत स्वतःला झोकून देण्याची तयारी यामुळे रणवीर आजच्या घडीचा सर्वात डायनॅमिक अभिनेता मानला जातो. त्याच्या नव्या सिनेमाची, ‘धुरंधर’, या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहेच, पण सेटवरून लीक झालेल्या चार वेगवेगळ्या लुक्सनी चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढवली आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा सिनेमा आधीपासूनच चर्चेचा विषय बनला असून, रणवीरच्या या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशननं त्याला एका नव्या उंचीवर नेलं आहे.

Ranveer Singh Dhurandhar
Palak Moong Dal Bhaji Recipe : पापड-लोणच्याला गुडबाय! पालक मुगाच्या कुरकुरीत भज्यांनी वाढवा जेवणाची चव

चला तर मग, रणवीरच्या ‘धुरंधर’ मधील चार लीक लुक्सवर एक नजर टाकूया:

१. पॉवरफुल आणि डेंजरस अवतार

रणवीर एका लूकमध्ये रायफल हातात घेतलेला दिसतो, चेहऱ्यावर तीव्रता आणि डोळ्यांत रौद्र भाव. केस अर्ध्या अंबाड्यात बांधलेले, सोबत कुर्ता-पायजमा असा रॉ आणि रग्ड स्टाईलचा अंदाज. हा लूक सिनेमाच्या अ‍ॅक्शन-पॅक्ड आणि ग्रिट्टी टोनचा स्पष्ट संकेत देतो.

२. पठाणीमध्ये करिष्माई लूक

दुसऱ्या लूकमध्ये रणवीर ब्लॅक पठाणी सूटमध्ये झळकतो. एकदम स्टायलिश आणि पॉवरफुल. केस अर्धवट अंबाड्यात बांधलेले असून, काही केस मोकळे सोडले आहेत आणि दाढी घनदाट आहे. त्याचा हा लूक करिष्मा आणि उर्जा यांचा उत्तम संगम दाखवतो.

३. पिंक पगडी आणि पॉवर सूट

एका फोटोत रणवीर ब्राउन पँटसूटमध्ये असून, डोक्यावर गुलाबी पगडी आहे. त्याच्या चेहऱ्यावर घनदाट दाढी आणि शरीरावर बळकटपणा स्पष्ट जाणवतो. त्याचा हा लूक कमांडिंग आणि इन्टेन्स आहे – प्रेक्षकांमध्ये आदर आणि उत्सुकता निर्माण करणारा.

४. रग्ड अवतार – लांब केस आणि सिगरेट

एका व्हिडीओ क्लिपमध्ये रणवीर लांब, विस्कटलेले केस, जाड दाढी, आणि पठाणी कुर्ता-पायजमा परिधान करून दिसतो. हातात सिगरेट आणि डोळ्यांत जबरदस्त तीव्रता – यामुळे त्याचा हा लूक अलाउद्दीन खिलजीच्या आठवणी जागवतो.

‘धुरंधर’ हा चित्रपट केवळ रणवीरच्या अभिनयामुळे नव्हे, तर त्याच्या अंगभूत रूपांतर क्षमतेमुळेही चर्चेचा विषय ठरत आहे. विविध रूपांत प्रेक्षकांसमोर येणाऱ्या रणवीरकडून काय धडाकेबाज परफॉर्मन्स मिळणार आहे, हे पाहणं नक्कीच रोचक ठरणार आहे.

Ranveer Singh Dhurandhar
Mughal History: मुघलांच्या राज्यात महाराष्ट्र कसा दिसायचा? दुर्मिळ फोटो आले समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com