Saam Tv
रोज जेवणासोबत पापड खाणं सोडा अन् बनवा झटपट पालक मुगाचे कुरकुरीत भजी
घरामध्ये जेवताना वरण भातासोबत आपण पापड लोणचं खात असतो.
महिलांना कामाच्या दगदगीत घरी मुलांसाठी काही बनवायला वेळच मिळत नाही.
त्यामुळे आज आपण अगदी कमी वेळात कुरकुरीत आणि चटपटीत पालक मुगाची खमंग भजी बनवण्याची रेसिपी जाणून घेणार आहोत.
मूग डाळ, कांदा, पालक, आलं, कोथिंबीर, मीठ, जीरं, तेल, हळद, धणे, तांदळाचे पीठ इ.
दोन तास मुगाची डाळ भिजवा. पुढे मिक्सरच्या भांड्यात जिरे, धणे, आल्याचा तुकडा, मीठ आणि डाळीचे वाटण करा.
वाटणात ज्यास्त पाण्याचा वापर करू नका. आता कांदे आणि पालक बारिक चिरून घ्या.
आता भाज्या वाटणात घाला आणि मिक्स करा. त्यात पाणी घाला आणि जाडसर पीठ तयार करा.
तयार मिश्रणात सर्व आवडीचे मसाले घाला.
आता कढईत तेल तापवा आणि नेहमीसारखे भजी तळून घ्या. हे भजी तुम्ही जेवणासोबत किंवा चहासोबत सुद्धा खाऊ शकता.