Rani Mukherji At Durga Pandal
Rani Mukherji At Durga PandalSaam TV

Rani Mukharji Video: 'देवीपेक्षा तू महान आहेस का?' देवीच्या मंडपात चप्पल घालून गेलेल्या राणी मुखर्जीला नेटकऱ्यांनी धरलं धारेवर

Rani Mukerji At Durga Pooja: राणी मुखर्जी मंडपात चप्पल घालून देवीच्या पाया पडताना दिसत आहे.
Published on

Rani Mukherji Get Troll:

देशाभरात नवरात्रीची धूम आहे. अनेक सेलिब्रिटी दुर्गा पूजेत सहभागी झाझाल्याचे अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. मुंबईतील जुहू येथील एका सार्वजनिक दुर्गा पूजेत सेलेब्रिटी सहभागी झाले आहेत. काजोल, वत्सल सेठ, इशिता दत्ता, सुमोना चक्रवर्ती, तनिषा मुखर्जी, राणी मुखर्जीसह अनेक कलाकार दुर्गा पूजेसाठी जमले होते.

बॉलिवूड कलाकारांनी देवीचे दर्शन घेतेले, देवीची पूजा देखील केली. या कार्यक्रमात सहभागी झालेली अभिनेत्री राणी मुखर्जीला मात्र नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राणी मुखर्जी आणि काजोल यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्रींचे फॅन्स त्यांच्या लूकचे कौतुक करत आहेत. पण दुसरीकडे देवीच्या मंडपात राणी चप्पल घालून दिसल्याने ट्रोल देखील होत आहे. राणी मुखर्जी मंडपात चप्पल घालून देवीला नमस्कार करताना दिसत आहे. तसेच चप्पल घालून ती देवीच्या जवळ जाऊन फोटो काढताना देखील दिसत आहे.

राणी मुखर्जीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. 'चप्पल काढली असती उंची कमी झाली मॅडमची', 'तिने चप्पल घातली आहे, 'चप्पल तरी काढायची, देवीपेक्षा महान नाहीयेस', 'देवीची भक्त असल्याचा दिखावा करतेय. चप्पल तरी काढायची.' 'अरे देवा! चप्पल घालून देवाच्या इतक्या जवळ गेलीय ही' अशा अनेक कमेंट राणी मुखर्जीच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. (Latest Entertainment News)

Rani Mukherji At Durga Pandal
Salman Khan-Kriti Sanon: 'माझं डोकं फिरवू नको', क्रिती सेननवर भडकला सलमान खान

राणी मुखर्जीच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर, 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नार्वे' हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. तिचा हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला देखील.

आजच्या दुर्गा पूजेतील काजोलचा देखील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काजोल फोनमध्ये बघता बघता स्टेजवरून खाली पडली. खाली असलेल्या लोकांनी तिला सावरलं. तर तिचा मुलगा युग देखील तिच्या मदतीला आला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com