Ramayana Movie: सेम टू सेम; दिव्य रूप अन् तीक्ष्ण नजर, रणवीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटातील फोटो झाले लीक

Ramayana Movie: प्रेक्षक 'रामायण' चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत, पण यादरम्यान, चित्रपटातील कलाकारांचे त्यांच्या भूमिकेतील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Ramayana Movie
Ramayana MovieSaam tv
Published On

Ramayana Movie: २०२६ मध्ये चाहते ज्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यात नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' हा चित्रपट आहे. या चित्रपटाचा पहिला लूक २०२५ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि तेव्हापासून प्रेक्षक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. रणबीर कपूर भगवान रामाची भूमिका साकारणार आहे आणि साई पल्लवी सीता मातेची भूमिका साकारणार आहे. आता सोशल मीडिया या पात्राचे फोटो व्हायरल झाले आहेत.

लीक झालेले नाही...

एका नेटकऱ्याने एआयच्या मदतीने "रामायण: द लेजेंड ऑफ प्रिन्स राम"मधील लूक तयार करून चित्रपटात हे पात्र कसे दिसतील याची झलक दिली आहे. "रामायण: द लेजेंड ऑफ प्रिन्स राम" मधील पात्रांच्या लूकवर आधारित, सोशल मीडिया निर्मात्याने नितेश तिवारीच्या "रामायण" मधील कलाकारांच्या चेहऱ्यांचा वापर करून त्यांना अॅनिमसारखा लूक दिला आहे.

Ramayana Movie
Grammy Awards 2026: ९० व्या वर्षी दलाई लामांनी जिंकला पहिला 'ग्रॅमी पुरस्कार'; पाहा विजेत्यांची यादी

या अॅनिमे लूकमध्ये सनी देओल महाबली हनुमानाची भूमिका साकारणार आहे आणि सुपरस्टार यश रावणाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटातील पात्रांचा एआयने तयार केलेला लूक अगदी वास्तववादी दिसतो आणि टीझर व्हिडिओशी तुलना केली तर तो अगदी जुळतो.

Ramayana Movie
Rashmika-Vijay: रश्मिकाला झाली लगिन घाई! विजय देवरकोंडासोबत फेब्रुवारीत 'या' तारखेला करणार शाही विवाह

लूक पाहून नेटकरी थक्क

हे फोटो पाहून एखाद्याला वाटेल की हे चित्रपटातील लीक झालेले फोटो आहेत, परंतु, हे फोटो एआय वापरून तयार केले गेले आहेत. पहिल्या फोटोमध्ये, रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत दिसत आहे. धनुष्यबाण घेऊन, अॅनिम चित्रपटासारखाच लूक दिसत आहे. त्याचप्रमाणे, हनुमान, सीता, रावण आणि लक्ष्मण यांच्या पात्रांचे फोटो देखील हुबेहुब दिसत आहे.

नेटकरी कमेंट सेक्शनमध्ये या लूकचे कौतुक करत आहेत. एका फॉलोअरने कमेंट केली, "यशचे हावभाव एआय वापरून तयार केले असले तरी ते सेम वाटत आहेत." आणखी एक युजर म्हणाला, रणबीर, यश, साई खूपच अप्रतिम दिसत आहेत, या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहोत,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com