Game Changer Collection: अवघ्या तीन दिवसांत राम चरणचा 'गेम ओव्हर'; प्रेक्षकांनी फिरवली पाठ पण पुष्पा भाऊची क्रेझ कायम

Game Changer Box Office Collection Day 3: 10 जानेवारी रोजी राम चरणचा 'गेम चेंजर'आणि सोनू सूदने 'फतेह' प्रदर्शित झाला. राम चरणचा गेम चंगेर आणि सोनू सूदचा फतेह चित्रपट चांगला असला तरी चित्रपटाला प्रतिसाद मिळत नाही.
Game changer and Pushpa 2
Game changer and Pushpa 2Google
Published On

Game Changer: राम चरणचा गेम चेंजर रिलीज होऊन ३ दिवस उलटले आहेत. वीकेंडला चित्रपट चांगली कमाई करेल अशी आशा निर्मात्यांना वाटत होते. पण या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा खूपच कमी कामे केली आहे. राम चरणच्या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी भारतातून १७ कोटींची कमाई केली आहे. सोनू सूदच्या फतेह चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

'गेम चेंजर'ने तिसऱ्या दिवशी किती कमाई केली

राम चरणच्या 'गेम चेंजर'ने तिसऱ्या दिवशी भारतातून 17 कोटी रुपये कमवले आहेत. यामध्ये तेलगूमधून 8 कोटी, तमिळमधून 1.2 कोटी आणि हिंदीतून 7.7 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे. तर कन्नडमधून चित्रपटाने 0.1 कोटींची कमाई केली आहे. यासह, चित्रपटाचे एकूण भारतीय कलेक्शन 89.6 कोटी रुपये आहे. राम चरणच्या चित्रपटाकडून ग्रॉस कलेक्शन 270 कोटींच्या कमाईची अपेक्षा आहे. पण लोक याला गेम ओव्हर का म्हणत आहेत कारण जर वीकेंडला 17 कोटी रुपये कमावले असतील तर हा चित्रपट पुढील आठवड्यामध्ये अधिक कमाई करणे कठीण आहे.

Game changer and Pushpa 2
Nora Fatehi : लॉस एंजेलिसमध्ये नोरा फतेही अडकली, प्रचंड घाबरत अग्नितांडवाचा व्हिडीओ केला पोस्ट

'फतेह'चे काय ?

'फतेह' या चित्रपटात सोनू सूदही दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून काम करत आहे. त्याचा 'फतेह' चित्रपटातील अभिनय अप्रतिम आहे. पण चाहत्यांनी हा चित्रपट फारसा आवडत नाही आहे. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 2.17 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी २.४ कोटींची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी २.१ कोटींचा व्यवसाय केला होता. यासह, चित्रपटाने भारतातून एकूण 6.67 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Game changer and Pushpa 2
Piyush Mishra Birthday: मृतदेहाच्या बाजूला झोपून काढली रात्र; आज जगप्रसिद्ध संगीतकार, पियुष मिश्रांची भावुक कहाणी

राम चरण तिसऱ्या दिवशी पुष्पा 2 च्या जवळपासही नाही

तिसऱ्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांची यादी आली आहे. ज्यात अल्लू अर्जुनचा चित्रपट अव्वल आहे. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी हिंदीत 73.5 कोटींची कमाई केली होती. त्याचवेळी राम चरणच्या गेम चेंजरला 50 चित्रपटांमध्येही स्थान मिळालेले नाही.

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' रिलीज होऊन 39 दिवस झाले आहेत. पण नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाशी तुलना केली तर पुष्पा भाऊ अग्रेसर आहेत. या चित्रपटाने 39 व्या दिवशी एकूण 2.35 कोटींची कमाई केली आहे, जी सोनू सूदच्या चित्रपटापेक्षा जास्त आहे. यासह, चित्रपटाने भारतात एकूण 1220.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com