Rakhi Sawant Hospitalized: राखी सावंतची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये दाखल

Rakhi Sawant News: बॉलिवूडची आयटम गर्ल राखी सावंतला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयाशी संबंधित आजारामुळे राखी सावंतला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
Rakhi Sawant
Rakhi SawantSaam Tv

Rakhi Sawant Hospitalized:

बॉलिवूडची आयटम गर्ल राखी सावंतला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयाशी संबंधित आजारामुळे राखी सावंतला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. रुग्णालयातील राखीचे काही फोटोही समोर आले आहेत. जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये राखी रुग्णालयाच्या खाटेवर बेशुद्ध अवस्थेत दिसत आहे आणि डॉक्टर तिची तपासणी करत आहेत. या बातमीमुळे राखीच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. ती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी तिचे चाहते प्रार्थना करत आहेत.

Rakhi Sawant
Shamita Shetty : शमिता शेट्टी गंभीर आजाराशी देतेय झुंज, हॉस्पिटलमधून शेअर केला व्हिडीओ

Viral bhayani ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर राखी सावंतचे काही फोटो शेअर केले आहेत. जे रुग्णालयांमधील आहेत. राखी बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयातील खाटेवर असल्याचं यात दिसत आहे.

मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, राखी सावंतला हृदयाशी संबंधित गंभीर आजार आहे. सध्या राखीला तिच्या आरोग्याच्या समस्येबाबत गोपनीयता राखायची आहे. टाईम्स नाऊशी संवाद साधताना तिने याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. ती सध्या बोलण्याच्या स्थितीत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Rakhi Sawant
Salman Khan : काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला माफ करायला बिश्नोई समाज तयार, पण समोर ठेवली मोठी अट

मात्र राखीने स्वतः सांगितलं आहे की, ''मला हृदयाशी संबंधित त्रास आहे. हे समजून घ्या...मी आत्ता रुग्णालयामध्ये बोलू शकत नाही, म्हणून मला आता कॉल करू नका."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com