Actress : त्याने स्पर्श केला अन्... प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत चित्रपटाच्या सेटवर गैरवर्तन, स्वत: सांगितली आपबिती

Radhika Apte : राधिका आपटे ही सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. नुकतंच राधिकाने एका चॅटशोला भेट दिली. या मुलाखतीदरम्यान तिने सिनेमाच्या सेटवर झालेल्या गैरवर्तवणूकीचा प्रसंग सांगितला.
Radhika Apte
Radhika Apte x
Published On
Summary
  • राधिका आपटेने सेटवर झालेल्या गैरवर्तनाचा धक्कादायक किस्सा सांगितला.

  • दाक्षिणात्य अभिनेत्याने शूटींगदरम्यान तिच्या पायाला स्पर्श करून गुदगुल्या केल्या.

  • त्याच वेळी अभिनेत्याच्या कानशिलात लगावल्याचे राधिकाने सांगितले.

Radhika Apte News : मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्री राधिका आपटेने नाव कमावले आहे. सिनेमांसह तिने अनेक ओटीटी शोजमध्येही तिने काम केले आहे. अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठी राधिका ओळखली जाते. अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात करतानाच राधिका आपटे एका प्रकरणामुळे चर्चेत आली होती. एका मुलाखतीमध्ये तिने या प्रकरणाची माहिती दिली.

राधिका आपटेला एका दाक्षिणात्य सिनेमाच्या शूटींगच्या वेळेला वाईट अनुभव आला होता. नेहा धुपियाच्या चॅटशोला तिने नुकतीच भेट दिली होती. या मुलाखतीदरम्यान राधिका म्हणाली, त्या चित्रपटाच्या शूटींगचा सेटवरचा माझा पहिला दिवस होता. सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याने माझ्या पायाला स्पर्श केला. त्याने गुदगुल्या करायला सुरुवात केली.

Radhika Apte
Actor Death Mystery : कॉल बॉयशी शरीरसंबंध, अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केले.. नंतर जमिनीत आढळला अभिनेत्याचा मृतदेह

'अभिनेत्याने पायाला गुदगुल्या केल्याने मला धक्का बसला. चित्रपटाच्या आधी आम्ही भेटलो नव्हतो. भेट झाली नसताना, ओळख नसताना तो असं कसं करु शकतो? त्याच वेळी मी त्या अभिनेत्याच्या थोबाडीत मारली', असे राधिका आपटेने सांगितले. हा प्रसंग एका तमिळ चित्रपटाच्या सेटवर झाल्याचे राधिकाने चॅटशोमध्ये सांगितला.

Radhika Apte
Maharashtra Politics : अजित पवार गटाला मोठा झटका, बड्या नेत्याने केला शिंदे गटात प्रवेश

राधिका आपटेने शाहिद कपूरच्या 'लाईफ हो तो ऐसी' या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत प्रवेश केला. 'तुकाराम', 'लय भारी', 'पोस्टकार्ड' अशा मराठी चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. याशिवाय 'मांझी', 'बदलापूर', 'अंदाधुंद' अशा हिंदी सिनेमांमध्ये ती झळकली आहे. नेटफ्लिक्सच्या 'द सेक्रेड गेम्स' या वेबसीरीजमध्ये राधिका आपटेने दमदार काम केले होते. 'ओटीटी क्वीन' अशी तिची ओळख बनली होती.

Radhika Apte
Jerusalem Terror Attack : राजधानीत दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार! ५ जणांचा जागीत मृत्यू, थरारक VIDEO समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com