Priyanka Chopra: 'मी २० व्या वर्षी खूप स्वार्थी होते...'; प्रियांका चोप्राने स्वत:बद्दल केला धक्कादायक खुलासा, नेमकं प्रकरण काय?

Priyanka Chopra: प्रियांका चोप्राने अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळाबद्दल सांगितले. त्यावेळी तिने कशाप्रकारे काम केल याची आठवण करुन दिली.
Priyanka Chopra
Priyanka ChopraSaam Tv
Published On

Priyanka Chopra: ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राने अलीकडेच एका कार्यक्रमात तिच्या सुरुवातीच्या कारकिर्दीबद्दल मोकळेपणाने सांगितले. तिने खुलासा केला की जेव्हा ती नवीन होती तेव्हा ती खूप महत्त्वाकांक्षी होती आणि कोणत्याही भूमिकेसाठी हो म्हणायची.

मी खूप स्वार्थी होते

टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, अबू धाबी येथील ब्रिज समिट दरम्यान प्रियांका म्हणाली, "माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात मी अजिबात चुझी नव्हते. माझ्या वाट्याला येणारे कोणतेही काम मी स्वीकारायचे कारण काम मिळवणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. माझ्या २० व्या वर्षी खूप स्वार्थी होते. मला दररोज काम करायचे होते."

Priyanka Chopra
Dhurandhar Viral Video: रणवीर सिंगच्या धुरंधरच्या गाण्याची पाकिस्तानमध्ये हवा; लग्नात थिरकतात वऱ्हाडी, पाहा व्हायरल VIDEO

यशासाठी अनेक त्याग करावे लागले

प्रियंकाने उघड केले की तिने यश मिळवण्यासाठी अनेक त्याग केले. ती म्हणाली, "मी वाढदिवस, दिवाळी, ख्रिसमस साजरा केला नाही आणि माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवला नाही. माझे वडील रुग्णालयात असतानाही मी त्यांच्यासोबत राहू शकले नाही. त्या वयात, आज मी जे जीवन जगतो ते जगण्यासाठी मला खूप कष्ट करावे लागले."

प्रियांका पुढे म्हणाली, "आज मला कोणत्या चित्रपटांना कधी हो म्हणायचे आणि कधी नाही म्हणायचे हे निवडण्याची संधी मिळाली आहे. जर मी त्यावेळी इतके कष्ट घेतले नसते तर मला हे स्वातंत्र्य मिळाले नसते. म्हणून मी स्वतःचे खूप खूप आभार मानते."

Priyanka Chopra
Shah Rukh Khan: बॉलिवूडचा बादशाहाची जगभरात क्रेझ; किंग खानला मिळाला हा मोठा किताब

प्रियांकाच्या कामाबद्दल

सध्या, प्रियांका दिग्दर्शक राजामौली यांच्या "वाराणसी" चित्रपटाच्या शूटसाठी व्यग्र आहे. या चित्रपटात ती महेश बाबूसोबत दिसणार आहे. तिचा हॉलिवूड चित्रपट "हेड्स ऑफ स्टेट" नुकताच प्रदर्शित झाला. तिचा हॉलिवूड चित्रपट "द ब्लफ" २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com