
मुंबई: रानबाजार वेब सिरीजमध्ये (RaanBaazaar) बोल्ड सीन्स देत मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) खळबळ माजवली होती. सोज्वळ प्राजक्ताला बोल्ड रुपात पाहताना अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. तिच्या अभिनयामुळे चाहत्यांनी तिला भरभरून प्रेम दिलं. कॉमेडी शो, नृत्य, लावणीच्या तालावर थिरकरणारी प्राजक्ता जेव्हा आपल्या सोज्वळ व्यक्तिमत्वापेक्षा वेगळ्या भुमिकेत शिरली तेव्हा ते तिच्यासाठी आव्हानात्मक होतं असं तिने सांगितलं होतं. तिने रानबाजारसाठी आपलं वजनही ५१ किलोंपासून ६४ किलोंपर्यंत वाढवलं होतं. यानंतर पुन्हा तिने आपलं वजन कमी करण्यासाठी बराच घाम गाळला. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते म्हणजे तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे. (Instagram Post) विषय कट... अशी पंचलाईन तिने आपल्या पोस्टला दिली आहे. (Prajakta mali Again in Trending after RaanBaazaar web series see the new post)
हे देखील पाहा -
प्राजक्ताने नेमकं काय पोस्ट केलं?
लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांचा चित्रपट सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट प्राजक्ताने नुकताच पाहिला. यावेळी तिने चित्रपट पाहण्यासाठी तिने आजी आणि आजोबांना देखील आणलं होतं. त्यांनाही हा चित्रपट प्रचंड आवडल्याचं प्राजक्ताने सांगितलं. प्राजक्ताने आपल्या पोस्टमधून लिहिलं की, A day with "आजी-आजोबा" आणि आम्ही "सरसेनापती हंबीरराव" पाहिला. कौतुकाला शब्द अपूरे पडतील, इतका अप्रतिम झालाय चित्रपट असं म्हणत चित्रपटाचं भरभरुन कौतुक केलं आहे. पुढे ती म्हणाली की, "प्रविण दादा तू भारी आहेस - विषय कट" २.३० तासात तू दोन महाराजांची, त्यांच्या सरसेनापतीची, अंतर्गत राजकारणाची, स्वराज्याची गोष्ट ज्या हुशारीनं दाखवलीस त्याला तोडच नाही. तुझ्यातला प्रेमळ, समंजस, दूरदृष्टी असणारा गोड माणूस लेखनात उतरला आणि त्यांनी आम्हांला कितीतरी शिकवलं. त्यासाठी किती धन्यवाद देऊ? असं म्हणत तिने प्रविण तरडे यांचं कौतुक केलं आहे. सोबतचं #केवळप्रेम असा हॅशटॅग देत तिने हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसानं बघितलाच पाहिजे असं आवाहन केलं आहे. सोबतच हा चित्रपट पुन्हा किमान दोनदा तरी पाहणार आहे असंही ती म्हणाली आहे.
रानबाजारमधून प्राजक्ता चर्चेत
प्राजक्ताने नुकतीच रानबाजार या मराठी वेबसिरीजमधून अतिशय बोल्ड सीन्स देत तिच्यात दडलेलं टॅलेंट तिने दाखवून दिलं आहे. केवळ कॉमेडी, नृत्य, रिअॅलिटी शो यात अडकून न राहता तिला वेगळं काहीतरी करायचं होतं, म्हणून तिने रानबाजारमध्ये बोल्ड सीन्स देत तिने मराठी सिनेसृष्टीतला सर्वात बोल्ड सीन दिला. याबाबत ती म्हणाली होती की, "प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिकांमध्ये झळकण्याची, समाजात अस्तित्वात असणारी विविध पात्रं साकारण्याची, सतत काहितरी नवं करण्याची इच्छा असते. मी त्याला अपवाद नाही. लहानपणापासून स्मिता पाटील, रंजना यांना बघत मोठी झाले, (मी त्यांच्याइतकी मोठी नक्कीच नाही.) पण त्यांच्या कारकिर्दीतून प्रेरीत होऊन आणि तुम्हां मायबाप रसिक प्रेक्षकांवर विश्वास ठेवून केलेला हा प्रयत्न." असं म्हणत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
वजन वाढवलं आणि घटवलं
प्राजक्ताने तिच्या भूमिकेसाठी एक दोन नाही तर तब्बल ११ किलो वजन वाढवलं होतं. आता वेबसीरिज प्रदर्शित झाल्यानंतर तिने पुन्हा वजन कमी करण्याचा सपाटा लावला. आधी तिचं वजन ६१ किलो होतं. आता प्राजक्ताने तिच्या ट्रेनरच्या मदतीने ६ किलो वजन कमी केलं आहे. सध्या तिचं वजन ५५ किलो आहे. आपल्याला आणखी ४ किलो वजन कमी करायचं आहे असं तिने आपल्या इन्स्टाग्रामवरुन सांगितलं आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.