
मुंबई: प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moosewala) याची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आली. सिद्धूच्या मृत्यूनंतर त्याच्या चाहत्यांना दुःख अनावर झालं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते सिद्धू मुसेवाला याला श्रद्धांजली वाहत आहेत. सिद्धू अवघ्या २८ वर्षांचा होता. पंजाबच्या (Punjab) मनसा जिल्ह्याजवळील परिसरात त्याची हत्या करण्यात आली. सिद्धूच्या मृत्यूनंतर मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. त्याचवेळी सिद्धूची सोशल मीडियावरील अखेरची पोस्ट व्हायरल (Viral Post) होत आहे. घटनेच्या ७ तास आधी त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ती पोस्ट शेअर केली होती. (punjabi singer sidhu moosewala last Social Media post viral Before his death Latest news Update)
हे देखील पाहा -
आपल्या जबरदस्त आवाजानं चाहत्यांच्या मनाचा ठाव घेणारा सिद्धू मुसेवाला याची शेवटची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे. ही सोशल मीडिया पोस्ट पाहून त्याचे चाहते कमालीचे भावूक झाले आहेत. सिद्धूने २९ मे रोजी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती. त्याचं ४ दिवसांपूर्वीच एक गाणं रिलीज झालं होतं. त्याने त्या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला होता. या पोस्टमध्ये त्यानं एक कॅप्शन लिहिली होती. 'इसे भूल जाओ, लेकिन मुझे गलत मत समझो' अशी कॅप्शन त्याने लिहिली होती. (Sidhu Moosewalal latest Marathi news)
दरम्यान, इन्स्टाग्रामवर सिद्धू मुसेवाला याचे ७ मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. त्याच्या या शेवटच्या पोस्टला ७९ लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. त्याचे चाहते ही पोस्ट शेअर करत आहेत. ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टवर प्रतिक्रिया देताना चाहते भावुक झाले आहेत. तसेच त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. तर त्याची एक ट्विटरवरील शेवटची पोस्टही व्हायरल होत असून, या पोस्टमध्ये त्याने पिस्तूल हातात असताना, एक फोटो शेअर केलेला आहे.
सिद्धूच्या या पोस्टवरून प्रचंड वाद झाला होता. सिद्धूवर नेहमीच हिंसाचाराला खतपाणी घालत असल्याचा आरोप केले जात होते. सोशल पोस्टमध्ये पिस्तूल दाखवून हिंसाचाराला खतपाणी घालत असल्याच्या आरोपाखाली सिद्धूवर गुन्हाही दाखल झाला होता.
Edited By - Nandkumar Joshi
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.