लोकप्रिय मालिका 'मन उडू उडू झालं' घेणार प्रेक्षकांचा निरोप? हे आहे कारण

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे 'मन उडू उडू झालं'. ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू झालेली ही मालिका पाहता पाहता प्रेक्षकांच्या मन घर करून बसली.
Man Udu Udu Jhala Image
Man Udu Udu Jhala Image Saam Tv
Published On

मुंबई : टीव्हीवर अनके मालिका (Serial) प्रसारित होत असतात. प्रत्येक मालिका प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करत असते. यातील काही मालिका पहिल्या भागापासूनच हिट होतात, तर काही मालिका फारशा लोकप्रिय होऊ शकत नाहीत. अशीच झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे 'मन उडू उडू झालं'.

Man Udu Udu Jhala Image
लग्नाची अफवा पसरली, अथिया म्हणाली, या लग्नाला मला पण बोलवतील..

ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू झालेली ही मालिका पाहता पाहता प्रेक्षकांच्या मन घर करून बसली. अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अभिनेता अजिंक्य राऊत यांची धमाल केमिस्ट्री या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मात्र आता ही मालिका निरोप घेणार आहे.

Man Udu Udu Jhala Image
Video : ऋषीमुनींच्या कठोर तपश्चर्येने निर्माण झाले 'ब्रह्मास्त्र', अयान मुखर्जीने सांगितली शस्त्रांची ही कहाणी

सर्वांची लाडकी दीपू आणि डॅशिंग आणि तितकाच हळवा असलेला इंद्रा यांची 'मन उडू उडू झालं' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी 'तू चाल पुढं' ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून अभिनेत्री दीपा परब पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. या मालिकेची गोष्ट एका गृहिणीच्या स्वप्नांवर आधारीत आहे. एक गृहिणी काटकसर करून फक्त आपला संसारच नाही, तर आपली स्वप्नपूर्तीही करू शकते, असा संदेश देणारी ही नवीन मालिका आहे.

झी मराठी वाहिनीवर १३ ऑगस्टला 'मन उडू उडू झालं' या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असून, त्याजागी 'तू चाल पुढं' ही मालिका १५ ऑगस्टपासून संध्याकाळी ७.३० वाजता सोमवार ते शनिवार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या टीझरला प्रेक्षकांनी भरघोस पसंती दिली आहे. टीझर प्रमाणेच ही मालिका देखील प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करण्यात यशस्वी होणार का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com