Famous Singer Death: प्रसिद्ध गायकाचा कार अपघातात मृत्यू ; वयाच्या ४० व्या वर्षी निधन,संगीत विश्वात शोककळा पसरली

Singer Death: पंजाबी संगीतविश्वातून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय पंजाबी गायक हरमन सिद्धू यांचे मानसा जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात निधन झाले आहे.
Popular Punjabi singer Harman Sidhu has passes away in Road accident in Punjab at age 40 on 18th November
Popular Punjabi singer Harman Sidhu has passes away in Road accident in Punjab at age 40 on 18th NovemberSaam Tv
Published On

Singer Death: पंजाबी संगीतविश्वातून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय पंजाबी गायक हरमन सिद्धू यांचे मानसा जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ते अपघातात निधन झाले आहे. वयाच्या फक्त ४० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. ही घटना मंगळवारी उशिरा रात्री मानसा येथील ख्याला गावाजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, हरमन सिद्धू ख्याला गावाकडे कारने परतत होते. त्यावेळी त्यांच्या कारची ट्रकशी जोरदार धडक झाली. धडक एवढी प्रचंड होती की कारचा क्षणात चुराडा झाला आणि सिद्धू यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु तेव्हाच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Popular Punjabi singer Harman Sidhu has passes away in Road accident in Punjab at age 40 on 18th November
Bigg Boss 19 च्या घरात आला प्रणितचा पुतण्या; क्यूट स्माईल आणि निरागस स्वभावानं जिंकली नेटकऱ्यांची मनं

हरमन सिद्धू हे पंजाबमधील उदयोन्मुख आणि लोकप्रिय गायक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या “प्यार गीता”, “काग़ज़ या प्यार” यांसारख्या गाण्यांना लोकप्रियता मिळाली होती. स्थानिक ते आंतरराज्य पातळीपर्यंत त्यांनी स्वतःचा एक वेगळा चाहतावर्ग तयार केला होता. त्यांच्या अकस्मात निधनामुळे संगीतप्रेमींमध्ये अत्यंत निराशा आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

Popular Punjabi singer Harman Sidhu has passes away in Road accident in Punjab at age 40 on 18th November
Siddhanth Kapoor: बॉलिवूडवर पुन्हा ड्रग्जचं सावट; २५२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला समन्स

हरमन सिद्धू यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्यामागे त्यांची पत्नी आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली असून सर्वजण अत्यंत दुःखी मनाने श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com