प्रेग्नंन्सीच्या बातम्यांवर पूनम पांडेने दिले दिलखुलास उत्तर
प्रेग्नंन्सीच्या बातम्यांवर पूनम पांडेने दिले दिलखुलास उत्तर instagram

प्रेग्नंन्सीच्या बातम्यांवर पूनम पांडेने दिले दिलखुलास उत्तर

पूनम पांडे लवकरच आई बनणार आहेत अशा बातम्या मीडियावर आल्या. परंतु अभिनेत्रीने पूनम पांडेने हे वृत्त नाकारले आहे. पूनम पांडेने एका इंग्रजी वेबसाईटला मुलाखत दिली आहे.
Published on

बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे (Punam Pande) तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत असते. गेल्या वर्षीही ती लग्नामुळे चर्चेत होती. पूनम पांडेने तिचा धीरगं काळ प्रियकर असलेल्या सॅम बॉम्बेशी लग्न केले होते. अलीकडेच तिच्या गर्भावस्थेविषयीच्या बातम्याही समोर आल्या. अशा बातम्यांवर आता पूनम पांडेने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पूनम पांडे लवकरच आई बनणार आहेत अशा बातम्या मीडियावर आल्या. परंतु अभिनेत्रीने पूनम पांडेने हे वृत्त नाकारले आहे. पूनम पांडेने एका इंग्रजी वेबसाईटला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरीच चर्चा केली आहे. पूनम पांडेने तिचे आयुष्य खुल्या पुस्तकासारखे आहे असे सांगून तिच्या गरोदरपणाच्या बातम्यांचा ब्रेक लावला आहे.

पूनम पांडे म्हणाली, 'जबरदस्तीने गरोदर बनवू नका'. एखाद्या महिलेसाठी ही चांगली बातमी असू शकते, परंतु माझ्यासाठी ती वाईट बातमी आहे. म्हणूनच सांगेते मी गरोदर नाही. एकदा मला विचारा तरी. माझे जीवन खुल्या पुस्तकासारखे आहे. मी गर्भवती असल्यास मी पेढे वाटेल. याशिवाय पूनम पांडेने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बर्‍याच गोष्टी बोलल्या आहेत. मागील वर्षी पूनम पांडेने आपला प्रियकर सॅम बॉम्बेबरोबर गुपचूप लग्न केले होते.

चाहत्यांना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून दोघांच्या लग्नाची माहिती मिळाली. लग्नाच्या १२ दिवसांनंतर पूनम पांडेने पती सॅमवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला होता आणि त्याच्याविरूद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. जेव्हा हे सर्व घडले तेव्हा पूनम आणि सॅम त्यांच्या हनीमूनसाठी गोव्याला गेले होते. पूनमच्या तक्रारीनंतर सॅमला गोवा पोलिसांनी अटक केली होती, परंतु एका दिवसानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले होते.

Edited By : Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com