P.S 2 Box Office Collection: बहुप्रतिक्षित पोन्नियन सेल्वनची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई; पहिल्याच दिवशी अटकेपार झेंडा

'पोन्नियन सेल्वन 2'ची पहिल्या भागाप्रमाणेच बॉक्स ऑफिसवर जोरदार ओपनिंग करत दमदार कमाई केली आहे.
Ponniyin Selvan 2 1st Day Box Office Collection
Ponniyin Selvan 2 1st Day Box Office CollectionInstagram @aishwaryaraibachchan_arb

Ponniyin Selvan 2 1st Day Box Office Collection: बहुचर्चित 'Ponniyin Selvan 2' काल चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मणिरत्नम दिग्दर्शित 'पोन्नियन सेल्वन 2' ला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. यासोबतच पहिल्या भागाप्रमाणेच 'PS 2' ने देखील बॉक्स ऑफिसवर जोरदार ओपनिंग करत दमदार कमाई केली आहे.

तामिळ चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक असलेल्या 'PS1' प्रमाणेच आता 'PS2' देखील नव-नवे विक्रम प्रस्थापित करताना दिसत आहे. एवढेच नाही तर 'PS 2' ने सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटालाही मागे टाकले आहे. चला तर जाणून घेऊया चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल... (Bollywood Film)

Ponniyin Selvan 2 1st Day Box Office Collection
Kiran Mane Post: प्रसिद्धीच्या शिखरावर पण पाय जमिनीवर... पारावर बसून किरण मानेंनी व्यक्त केली भविष्याची काळजी

' पोन्नियन सेल्वन 2' ने पहिल्या दिवशी किती कमाई केली?
'पोन्नियन सेल्वन 2' ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपट प्रदर्शित होताच थिएटरमध्ये प्रेक्षकांची एकच गर्दी झाली होती, परिणामी चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली. कमाईच्या आकड्यांबद्दल बोलायचे झाले तर, सकनील्कच्या रिपोर्टनुसार, 'पोन्नियन सेल्वन 2' ने पहिल्या दिवशी 32 कोटींची ओपनिंग कमाई केली आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केलेली सुरुवात पाहता, हा चित्रपट २०२३ या वर्षातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरण्याची शक्यता आहे. (Bollywood News)

Ponniyin Selvan 2 1st Day Box Office Collection
Aditya Dhar Trouble: ‘उरी’ फेम आदित्य धर यांच्या अडचणीत आणखी वाढ; रिलीजपूर्वीच आगामी सिनेमाला ‘इतक्या’ कोटींचे नुकसान

बिग बजेट आणि मल्टीस्टारर चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन 2' तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल सांगायचे तर, यात चियान विक्रम, ऐश्वर्या राय, कार्ती, त्रिशा, जयम रवी, ऐश्वर्या लक्ष्मी आणि शोभिता धुलिपाला यांच्यासह आर सरथकुमार, प्रभू, विक्रम प्रभू, जयराम, प्रकाश राज, पार्थिवन, रहमान, लाल, हे कलाकार आहेत. जयचित्रा, नस्सर यांच्यासह अनेक कलाकार आहेत.(Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com