Ashok Pandit Threats: ‘७२ हुरें’च्या निर्मात्यांना मिळत असलेल्या धमक्यांवर मुख्यमंत्र्यांनी उचलले कठोर पाऊल, पोलिसांना दिले ‘हे’ आदेश

Police Protection To Ashok Pandit: ‘७२ हुरें’चे निर्माते अशोक पंडित यांना काही धमकीचे मेल येत असल्याची माहिती मिळत आहे.
Ashok Pandit Thanks To CM Eknath Shinde
Ashok Pandit Thanks To CM Eknath ShindeSaam Tv
Published On

Ashok Pandit Thanks To CM Eknath Shinde: सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या ‘७२ हुरें’ काल चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या चित्रपटाची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. सेंट्रल बोर्डाने चित्रपट अप्रूव्ह करूनही चित्रपटाचा ट्रेलर रिजेक्ट करण्यात आला होता, त्यानंतर निर्मात्यांनी नाराजी व्यक्त करत परवानगी नसतानाही ट्रेलर युट्युबवर प्रदर्शित केला. अशातच चित्रपटाचे निर्माते अशोक पंडित यांना काही धमकीचे मेल येत असल्याची माहिती मिळत आहे.

Ashok Pandit Thanks To CM Eknath Shinde
Adipurush Writer Apology : चित्रपटाने गाशा गुंडाळल्यानंतर आदिपुरुषच्या लेखकाच्या डोक्यात पडला प्रकाश ; मागितली माफी

चित्रपटाचं प्रदर्शित होताच निर्माते अशोक पंडित यांना धमक्यांचे फोन येत होते. एका संवेदनशील विषयावर चित्रपट बनवल्यामुळे निर्मात्यांना धमक्या येत आहेत. चित्रपटाला धमक्या मिळत असतानाच महाराष्ट्र राज्य सरकारकडून पंडित यांना पोलिस सुरक्षा मिळणार आहे. निर्मात्यांना आता सुरक्षा मिळत असल्यामुळे त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

राज्य सरकारकडून पोलिस सुरक्षा मिळाल्यानंतर अशोक पंडित म्हणाले, “मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलिस संरक्षण देण्याची विनंती केली होती.” पोलिस संरक्षण मिळाल्यानंतर निर्मात्यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच मुंबई पोलिसांचे देखील आभार मानले. दहशतवादाविरुद्ध सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज असल्याचे देखील निर्माते म्हणाले आहेत. मी कोणाला घाबरत नाही आणि या सगळ्याची आपल्याला पर्वा नाही, अशी प्रतिक्रिया निर्मात्यांनी माध्यमांसोबत बोलताना दिली आहे.

Ashok Pandit Thanks To CM Eknath Shinde
Katrina Kaif Spotted At Airport: कतरिना कैफला एअरपोर्टवर चाहत्यांकडून धक्का बुक्की, गर्दी पांगवण्यासाठी सेक्योरिटीने लावली अनोखी शक्कल, Video Viral

चित्रपटाबद्दल बोलायचे तर, हा चित्रपट काल अर्थात ७ जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. चित्रपटाला होत असलेल्या विरोधाचा फटका बॉक्स ऑफिस कलेक्शनला बसला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त ५० लाखांचीच कमाई केली आहे. चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला आहे.

संजय पूरण सिंह चौहान दिग्दर्शित ‘७२ हुरें’मध्ये प्रमुख भूमिकेत अभिनेता आमिर बशीर आणि पवन मल्होत्रा हे कलाकार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com