Adipurush Writer Apology : चित्रपटाने गाशा गुंडाळल्यानंतर आदिपुरुषच्या लेखकाच्या डोक्यात पडला प्रकाश ; मागितली माफी

Manoj Muntashir Controversy : आदिपुरुष चित्रपटातील संवादांमुळे सोशल मीडियावर लोक निर्मात्यांविरद्ध नाराजी व्यक्त करत होते.
Adipurush Dialogue Writer Manoj Muntashir Apologizes
Adipurush Dialogue Writer Manoj Muntashir ApologizesSaam TV
Published On

Adipurush Writer Share Post : आदिपुरुष चित्रपटाचा गाजावाजा कमी झाला आहे. परंतु हा चित्रपट सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. चित्रपटाच्या जवळजवळ प्रत्येक गोष्टीवर आक्षेप घेण्यात आला. कलाकारांचे लूक, व्हीएफएक्स, डायलॉग अशा बऱ्याच गोष्टी प्रेक्षकांना खटकल्या होत्या. दरम्यान आता चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशिर यांनी इंस्टाग्राम वर पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे.

याआधी मनोज मुंतशिर यांनी विविध प्लँटफॉर्मवरून स्पष्टीकरण दिले होते. आता सर्व सगळीकडून वादात अडकलेल्या या लेखकाने प्रेक्षकांची जाहीर माफी मागितली आहे. (Latest Entertainment News)

Adipurush Dialogue Writer Manoj Muntashir Apologizes
Baipan Bhari Deva : 'बाईपण भारी देवा' चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात गाठला कोट्यवधींचा पल्ला ; केदार शिंदेंची पोस्ट बघाच

लेखक मनोज मुंतशिर यांनी पोस्ट शेअर करत लिहिले आहे, 'आदिपुरुष चित्रपटामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या हे मी मान्य करतो. हात जोडून मी माझ्या सर्व बंधू-भगिनी, ज्येष्ठ, पूज्य संत आणि श्री राम भक्तांची बिनशर्त माफी मागतो. भगवान बजरंगबली आपल्या सर्वांना आशीर्वाद देवो, अखंड राहून आपल्या पवित्र शाश्वत आणि महान देशाची सेवा करण्याचे सामर्थ्य देवो.' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून लोक मनोज मुंतशीरने माफी मागावी अशी मागणी करत होते.

आदिपुरुष चित्रपटातील संवादांमुळे सोशल मीडियावर लोक निर्मात्यांविरद्ध नाराजी व्यक्त करत होते. त्यानंतर चित्रपटातील संवाद बदलण्यात आले. जिथे बाप शब्द वापरण्यात आला होता तिथे आता लंका हा शब्दाचा वापर करण्यात येत आहे.

क्रिती सेनन आणि प्रभासच्या या रामायणावर आधारित चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. चित्रपटाचे ऍडव्हान्स बुकिंग सुरु होताच प्रेक्षकांनी पटापट तिकिटे देखील बुक केली. त्यामुळे चित्रपटाचे ओपनिंग दणक्यात झाले. मात्र चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक निराश झाले. तसेच चित्रपटाच्या लेखक, दिग्दर्शक, निरमातये यांना ट्रोल करू लागले.

आदिपुरुष चित्रपट मॉर्डन पद्धतीने दाखविण्यात आला आहे. चित्रपटातील संवाद तरुण पिढीच्या बोलीभाषेतील होते. प्रेक्षकांना हे पसंत पडले नाही. त्यामुळे मनोज मुंतशिर यांच्यावर सतत टीका होता होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com