Sreelekha Mitra: पंतप्रधान मोदींचा अवमान? त्या कार्टूनमुळे अभिनेत्रीविरोधात तक्रार; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Sreelekha Mitra: CJP आंदोलनातील मोदींवरील पोस्टर वादात अभिनेत्री श्रीलेखा मित्राविरोधात पोलीस तक्रार दाखल. 'चष्मा नसल्याने पोस्टर दिसले नाही' म्हणत तिने आपली भूमिका स्पष्ट केली.
Sreelekha Mitra
Sreelekha MitraSaam Tv
Published On

Sreelekha Mitra: कोलकाता येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर टॉलीवूड अभिनेत्री श्रीलेखा मित्रा नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र असलेले पोस्टर हातात धरल्याचा आरोप करत तिच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यांत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, पंतप्रधानांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट करत श्रीलेखा मित्रा यांनी या आरोपांचे खंडन केले आहे.

भाजप नेत्या केया घोष यांनी आनंदपूर पोलीस ठाण्यात श्रीलेखा मित्राविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच बिधाननगर सायबर क्राईम पोलीस ठाण्यासह इतर काही जिल्ह्यांमध्येही अतिरिक्त तक्रारी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

Sreelekha Mitra
Actress Breast Cancer: ज्येष्ठ अभिनेत्रीने स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे लपवले, कारण सांगत म्हणाल्या, 'काम मिळण्यासाठी...'

तक्रारीनुसार, 24 जुलै रोजी सियालदह ते धर्मतळा दरम्यान विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चात श्रीलेखा मित्रा सहभागी झाली होती. यावेळी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र असलेले पोस्टर सार्वजनिकरीत्या प्रदर्शित केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. तक्रारीत संविधानाने शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार दिला असला तरी सार्वजनिक बदनामी, अपमान किंवा समाजात तेढ निर्माण करणारे कृत्य स्वीकारार्ह नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Sreelekha Mitra
Paach Futaacha Bachchan: वारकरी परंपरेची अनोखी कथा मोठ्या पडद्यावर; 'पाच फुटाचा बच्चन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

दरम्यान, पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारी नंतर यावर प्रतिक्रिया देताना श्रीलेखा मित्रा म्हणाल्या, त्या दिवशी त्यांनी वाचण्यासाठी वापरणारा चष्मा आणला नव्हता. "माझ्याकडे फक्त गॉगल होता. पोलिसांचा लाठीचार्ज सुरू असल्याने गडबडीत पोस्टरवरील चित्र नीट पाहण्याची संधीच मिळाली नाही," असे त्या म्हणाल्या.

मात्र, त्यांच्या या स्पष्टीकरणानंतरही भाजप नेत्या केया घोष यांनी कठोर कारवाईची मागणी कायम ठेवली आहे. पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह चित्रण केल्याचा आरोप गंभीर असल्याचे सांगत त्यांनी श्रीलेखा मित्रा यांच्यावर कायदेशीर कारवाई करून अटक करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com