Criminal Justice 4: माधव मिश्रा इज बॅक; क्रिमिनल जस्टिसचा चौथा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Criminal Justice 4 Trailer: पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'क्रिमिनल जस्टिस ४' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर सोशल मीडिया नेटकऱ्यांनी अभिनेत्याच्या माधव मिश्राच्या व्यक्तिरेखेचे ​​कौतुक केले आहे.
Criminal Justice 4
Criminal Justice 4Saam Tv
Published On

Criminal Justice 4: पंकज त्रिपाठी स्टारर वेब सीरिज क्रिमिनल जस्टिसच्या पहिल्या तीन सीझनना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर, चौथ्या सीझनचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. क्रिमिनल जस्टिस ही वेब सिरीज कोर्टरूम ड्रामावर आधारित आहे ज्यामध्ये प्रत्येक सीझनमध्ये अभिनेता पंकज त्रिपाठीचे पात्र माधव मिश्रा एका नवीन हत्येचे रहस्य उलगडताना दिसतो. चौथ्या सीझनची कथा एका लव्ह ट्रँगलवर आधारित असल्याचे दिसते यामध्ये मोहम्मद झीशान अयुब खान, आशा नेगी, सुरवीन चावला, श्वेता बसू प्रसाद, मीता वशिष्ठ सारखे कलाकार दिसत आहेत. क्रिमिनल जस्टिस ही लोकप्रिय वेब सिरीजपैकी एक आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, प्रेक्षकांनी या नवीन प्रकरणावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

नेटकरी माधव मिश्रा यांना पडद्यावर पाहण्याची वाट पाहत आहेत

जिओ हॉटस्टारच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. या ट्रेलरवर आपली प्रतिक्रिया देताना एका नेटकाऱ्याने लिहिले, 'मिश्रा जी परत आले आहेत', दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले, 'ट्रेलर पाहिल्यानंतर, मी खूप एक्सिटेड आहे.', दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले, 'मला वाटते की क्रिमिनल जस्टिस ही अशी मालिका आहे ज्याचा प्रत्येक सीझन मागीलपेक्षा चांगला होतो', एका नेटकाऱ्याने लिहिले, 'मिश्रा जी एक नवीन केस घेऊन येत आहेत'. आणखी एका नेटकाऱ्याने लिहिले, माधव मिश्रा इज बॅक

Criminal Justice 4
आलिया भट्टपासून ते ऐश्वर्या रायपर्यंत...; 78व्या Cannes Film Festival 2025मध्ये भारतीय सेलिब्रिटींची झळाळी

चौथा सीझनमध्ये दिसणार लव्ह ट्रँगल

क्रिमिनल जस्टिस ही एक लोकप्रिय मालिका आहे ज्याच्या मागील सीझनमध्ये पंकज त्रिपाठी, विक्रांत मेस्सी, कीर्ती कुल्हारी सारखे कलाकार दिसले आहेत. यावेळी नवीन सीझनमध्ये आणखी एक मर्डर मिस्ट्री आहे. मोहम्मद झीशान अयुब खान, आशा नेगी, सुरवीन चावला यांच्यातील लव्ह ट्रँगल दाखवण्यात आला आहे आणि तिघांपैकी एकाचा खून होतो.

Criminal Justice 4
Raid 2 Box Office Collection: 'रेड 2' चा बॉक्स ऑफिसवर धमाका; 13व्या दिवशीही अजय देवगनच्या चित्रपटाची कमाई जोमात

प्रथम आरोप झीशानच्या पात्र डॉ. राज नागपालवर आणि नंतर त्याची पत्नी अंजू नागपाल म्हणजेच सुरवीन चावला यांच्यावर येतो. दोन्ही पात्रे त्यांच्या वकिलांसह न्यायालयात एकमेकांविरुद्ध उभे राहतात तेव्हा ट्विस्ट येतो. क्रिमिनल जस्टिस ४ हा शो रोहन सिप्पी दिग्दर्शित करत आहे आणि २९ मे पासून जिओ-हॉटस्टारवर प्रसारित होणार आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com