Bigg Boss Marathi : तू हे डोक्यात फिट कर, पॅडीने सूरजला का दिला सल्ला?

Paddy Advice Suraj : या आठवड्यात बिग बॉस घराचा कॅप्टन सूरज झाला आहे. आता सूरजला पॅडी नॉमिनेशन बाबत सल्ला देताना पाहायला मिळणार आहे.
Paddy Advice Suraj
Bigg Boss MarathiSAAM TV
Published On

'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) प्रेक्षकांच्या मनावर दिवसेंदिवस राज्य करत आहे. संग्रामच्या येण्याने 'बिग बॉस मराठी' च्या घरात प्रत्येक जण प्लॅनिंग करण्यामागे लागले आहेत. प्रत्येक सदस्याच्या डोक्यात नवा गेम चालू आहे. या विकमध्ये सूरज कॅप्टन बनला आहे.

आजच्या बिग बॉस मराठीच्या भागात तुम्हाला मनोरंजनाचा धमाका पाहायला मिळणार आहे. पॅडी भाऊ (Pandharinath Kamble) सूरजला गेम बद्दल सल्ला देत आहेत. बिग बॉसच्या घरात सोफ्यावर बसून पॅडी सूरज यांच्यात संवाद घडत आहे. पॅडी भाऊ सूरजला म्हणतात की , "कुठल्या गोष्टींवर नॉमिनेट करायचे हे मी आता तुला सांगतो.

मागील आठवड्याच्या निकषावर नॉमिनेट करायचे असल्यास पॅडी सांगतो की, मागच्या आठवड्यात ज्या गोष्टी झाल्या. कोणती माणसे चुकीचे वागलीत मग त्यांना नॉमिनेट करायचे. जर गेमवरून नॉमिनेट करताना, मागच्या आठवड्यात जे खेळ झाले. खेळताना कोण चुकीचे वागले. हे तू डोक्यात फिट करून ठेव.

Paddy Advice Suraj
Bigg Boss Marathi : निक्की अन् अभिजीतच्या मैत्रीत पडणार फुट? बिग बॉसच्या घरात वादाचा नवा अंक

सूरज (Suraj Chavan) यावर म्हणाला की ,"असे तुम्ही मला रोज सांगता जा." त्यावर पॅडी म्हणाला, "हो मी सांगतो. हे सगळे सल्ल्याचे पैसे मी लिहून ठेवणार. एका दिवसाचे 10 हजार रुपये घेणार. आता बिग बॉसच्या घरातून या आठवड्याला कोण बाहेर जाणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तसेच सूरज आपली कॅप्टनसी कशी निभवतो याकडे प्रेक्षकांचे विशेष लक्ष लागून राहीले आहे.

Paddy Advice Suraj
Sangram Chougule Wife: बायकोलाही स्वतः सारखं बनवलं; संग्राम चौगुलेची पत्नी आहे तरी कोण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com