
ओटीटी विश्व म्हणजे चाहत्यांसाठी हा एक प्रकारचा मनोरंजनाचा खजिनाच आहे. प्रेक्षकांचा थिएटर ऐवजी ओटीटीकडे सर्वाधिक कल आहे. या आठवड्यामध्ये प्रेक्षकांना वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट पाहायला मिळणार आहेत. मुख्य बाब म्हणजे, अनेक बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांना ओटीटीवर पाहायला मिळणार आहेत. तुम्ही देखील यंदाच्या आठवड्यामध्ये अर्थात १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या तारखेमध्ये घरीच बसून चित्रपट आणि वेबसीरिज बघण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी नक्की वाचा...
रोमेंटिक कथा असणाऱ्या 'रायसिंघानी व्हर्सेस रायसिंघानी' ही सीरीज १२ फेब्रुवारी २०२४ रोजी SonyLiv वर रिलीज झाली आहे. रायसिंघानी कुटुंबावर आधारित चित्रपटाची कथा आहे. चित्रपटाची कथा काही प्रमाणात कोर्ट ड्रामावर आधारित आहे.
टॉलिवूड अभिनेता अशोक सेल्वन प्रमुख भूमिकेत असलेल्या चित्रपटाची कथा रोमँटिक आणि काही प्रमाणात ॲक्शनबाज अशी आहे. रोमँटिक कथा असणाऱ्या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना महाविद्यालयातील प्रेम पाहायला मिळेल. 'साबा नायागन' असं चित्रपटाचं नाव असून हा चित्रपट १४ फेब्रुवारीला Disney+ Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.
शाहरूख खानने चाहत्यांना ऐन ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी चाहत्यांना सरप्राईज दिला आहे. किंग खानचा ‘डंकी’ चित्रपट १५ फेब्रुवारीला ओटीटीवर रिलीज झाला आहे. शाहरूख खान आणि तापसी पन्नुचा ‘डंकी’ चित्रपट Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत शाहरूख आणि तापसी व्यतिरिक्त बोमन इराणी आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे.
सुदिप्तो सेन दिग्दर्शित 'द केरला स्टोरी' चित्रपट ५ मे २०२३ ला रिलीज झाला होता. रिलीज झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वादाच्या भोवऱ्यात अडकलेला. तरीही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. आता बॉक्स ऑफिसनंतर प्रेक्षकांना चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. येत्या १६ फेब्रुवारीपासून ZEE 5 ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना हिंदी, तमिळ, तेलुगू भाषेमध्ये पाहता येणार आहे.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार नागार्जुन याचा 'ना सामी रंगा' चित्रपट येत्या १७ फेब्रुवारी २०२४ रोजी Disney+ Hotstar वर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटामध्ये प्रेक्षकांन अभिनेत्याचा रावडी लूक आणि ॲक्शनबाज लूक पाहायला मिळणार आहे.
'अब्राहम ओझलर' या मल्याळम क्राईम ड्रामा चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटाचे ॲक्शनबाज कथानक आणि दमदार स्टारकास्ट असलेल्या चित्रपटाला दक्षिण भारतात जोरदार प्रतिसाद मिळाला. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत जयराम, अनस्वर राजन, अर्जुन अशोकन, अनुप मेनन आणि सिद्दिकी अशी स्टारकास्ट आहे. हा चित्रपट १६ फेब्रुवारी २०२४ रोजी Disney+ Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.