Navi Janmen Mi: स्वानंदीच्या बाबतीत घडली अघटित घटना; पण स्वानंदी आता रडणार नाही तर लढणार

Navi Janmen Mi: स्वानंदी समोर उभा राहिलेला प्रश्न म्हणजे तिच्या होणाऱ्या बाळाचा बाप कोण? या सगळ्या गोष्टींना मी कशी सामोरी जाणार या विचारांनी स्वानंदीला घेरलं आहे.
Navi Janmen Mi
Navi Janmen MiSaam Tv
Published On

Swanandi:

मुलींचं आयुष्य अनेकदा इतक्या नाजूक वळणावर असतं की त्यांना प्रत्येक पाऊल सांभाळून उचलावं लागतं. मग ते वयात येणं असो शिक्षण असो किंवा मग नोकरी आणि नोकरीच्या निमित्ताने दुसऱ्या ठिकाणी जाणं असो, संसार असो, सर्व निर्णय फार विचारपूर्वक घ्यावे लागतात.

Navi Janmen Mi
Telugu Film Industry मध्ये ७० वर्षांनंतर पहिल्यांदाच असं घडलं, फक्त Allu Arjun चीच चर्चा, काय आहे कारण?

बऱ्याच मुली स्वत:च्या जबाबदाऱ्या सांभाळून स्वत:चं आयुष्य देखील सुरळितपणे चालवत असतात. पण नेमकं असं काही घडतं की ज्यामुळे आयुष्यापुढे मोठा प्रश्न उभा राहतो. असंच काहीसं घडलंय ‘सन मराठी’ वरील ‘नवीन जन्मेन मी…’ या मालिकेतील स्वानंदीच्या बाबतीत.

आयुष्य आनंदाने जगणाऱ्या आणि इतरांचं जीवन आनंदाने फुलवणाऱ्या स्वानंदीचं आयुष्य एका वेगळ्या वळणावर पोहचलं आहे. एका पार्टीत स्वानंदीच्या बाबतीत अघटित घटना घडली आणि त्यानंतर तिच्यासमोर एक भयंकर प्रश्न उभा राहिला आहे.

स्वानंदी समोर उभा राहिलेला प्रश्न म्हणजे तिच्या होणाऱ्या बाळाचा बाप कोण? या सगळ्या गोष्टींना मी कशी सामोरी जाणार या विचारांनी जरी स्वानंदीला घेरलं असलं तरी नियतीच्या कचाट्यात अडकलेली स्वानंदी आता रडणार नाही तर लढणार आणि सत्याच्या संघर्षात स्वत: पुन्हा नव्याने घडणार.

स्वत: मध्ये असलेली जिद्द, धमक यामुळे स्वानंदी तिचा हा अडचणीचा रस्ता हिमतीने पार करणार हे नक्की. स्वानंदीच्या आयुष्याचा नवा प्रवास अनुभवण्यासाठी तुम्ही ‘नवीन जन्मेन मी…’ मालिका पाहू शकता. ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७:३० वाजता फक्त सन मराठीवर पाहता येईल.

Navi Janmen Mi
Swanandi Tikekar Ukhana Video: ‘कुलकर्णींची सून…’ म्हणत स्वानंदी टिकेकरने नवऱ्यासाठी घेतला खास उखाणा, तुम्ही एकदा ऐकाच...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com