Bhediya And Vikram Vedha Ott Release: वरुण धवनचा भेडिया आणि हृतिक रोशनचा विक्रम वेधा चित्रपट पडद्यावर येऊन बराच काळ लोटला असला तरी हा चित्रपट अद्याप ओटीटीवर आलेला नाही. हे दोन्ही चित्रपट मल्टीस्टारर असूनही बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही चित्रपटांच्या ओटीटी रिलीजची बरीच चर्चा आहे. हे चित्रपट डिजिटली कधी येतील हे चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. तुम्हीही या चित्रपटांची वाट पाहत असाल तर आज आम्ही तुम्हाला त्याची अपडेट देत आहोत. हे दोन्ही चित्रपट कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला पाहता येतील जाणून घेऊया.
भेडिया 21 एप्रिलला रिलीज होणार?
टेलिचक्करच्या वृत्तानुसार, भेडियाच्या ओटीटी रिलीजची तारीख अद्याप निर्मात्यांनी उघड केलेली नाही. परंतु मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवला तर या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीख निश्चित करण्यात आली आहे. हा चित्रपट 21 एप्रिलपासून जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 'भेडिया'मध्ये वरुण धवनसोबत क्रिती सेनन आहे.
हा चित्रपट 21 एप्रिलपासून जिओ सिनेमावर स्ट्रीम केला जाऊ शकतो असे सांगितले जात आहे. वरुण धवन आणि बी-टाऊन सुपरस्टार क्रिती सेनॉनच्या भेडियाबद्दल बोलायचे तर चित्रपटाला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मात्र अपेक्षेनुसार भेडिया बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करू शकला नाही. (Latest Entertainment News)
विक्रम-वेधा ८ मे रोजी ओटीटीवर!
हृतिक रोशनच्या विक्रम वेधबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट 8 मे रोजी OTT वर रिलीज होणार आहे. भेडियाप्रमाणेच तुम्ही हा चित्रपटही जिओ सिनेमावर पाहू शकता. सैफ अली खान देखील विक्रम वेध चित्रपटात हृतिकसोबत दिसला असून दोघेही एकमेकांसमोर आहेत. या दोघांशिवाय राधिका आपटे आणि योगिता बिहानी देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत.
विक्रम वेधने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे 78 कोटींचा व्यवसाय केला. जगभरात या चित्रपटाने जवळपास 135 कोटींची कमाई केली होती. चित्रपटाचे बजेट 150 कोटी होते. या चित्रपटात हृतिकसोबत सैफ अली खानही दिसला असून दोघेही एकमेकांच्या विरोधातील भूमिकेत दिसले आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.