मुंबईत दिसला Will Smith; यूजर्स म्हणाले, दूर राहा, तुमच्या कानाखाली वाजवेल! 

Will Smith
Will Smith Saam Tv
Published On

ऑस्कर 2022 (Oscar 2022) मध्ये कॉमेडियन ख्रिस रॉकला (Chris Rock) श्रीमुखात लगावल्यानंतर विल स्मिथ (Will Smith) मीडियापासून दूर म्हणजेच गायब होता. विल स्मिथची जगभरात चर्चा असून तो मुंबईत (Mumbai) वेळ घालवतआहे. हो, विल स्मिथ आज २३ एप्रिलला मुंबईतील कलिना विमानतळावर दिसला. या विमानतळावरून विल अमेरिकेला (America) परतताना दिसला.

Will Smith
"राणा दाम्पत्यांचं हिंदुत्व घंटाधारी आहे, आम्ही गदाधारी आहोत"

स्मिथ इस्कॉनमध्ये होता का?

विल स्मिथसोबत विमानतळावर इस्कॉनशी संबंधित एक व्यक्ती होती, असे सांगितले जात आहे. विल स्मिथ महाराष्ट्रातील वाडा येथे असलेल्या श्री श्री राधा वृंदावन बिहारी (इस्कॉन) मध्ये होता. येथे तो तीन दिवस राहिला. विल स्मिथ आध्यात्मिक व्यक्ती आहे. तो यापूर्वीही भारतात आला आहे. सद्गुरूंचीही भेट घेतली. विल याने मोटिव्हेशन वक्ते जय शेट्टी यांच्यासोबत भगवद्गीतेवरील त्याचे विचार शेअर केले. त्याचा हा व्हिडिओ चांगलाच लोकप्रिय झाला होता.

असेही सांगितले जात आहे की, विल स्मिथ गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील जुहू येथील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये थांबला होता. विल स्मिथही आज विमानतळावर त्याच्या गळ्यात जाडजूड माळ  घातलेला दिसला. त्याने पांढरा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची शॉर्ट घातली होती. विमानतळावर अनेक लोकांसोबत फोटोसाठी पोजही दिली.

युजर्सने लुटली  मजा 

जेव्हा विल स्मिथ मुंबईत येतो तेव्हा भारतातील लोक त्याची मजा लुटत असतात. सोशल मीडियावर नेटिव्ह यूजर्स त्याची खूपच खिल्ली उडवत आहेत. विल स्मिथने शेअर केलेल्या व्हिडीओवर एका यूजरने लिहिले की, 'कानाखाली लगावेल. जास्त जवळ जाऊ नका, तो बॉलिवूडचा नाहीय. दुसऱ्या युजरने लिहिले की, 'भाई, त्याच्या पत्नीचे नाव घेऊ नको.' दुसर्‍याने लिहिले, 'इथे कोणाचे कान उघडायला आला भाई.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'चला इथेही दोन-तीन लगावून जा. खूप मजा येईल.'

विलच्या आयुष्यातील गोंधळ

सध्या विल स्मिथ त्याच्या वैयक्तिक आयुष्यात खूप वाईट टप्प्यातून जात आहे. तो पत्नी जेडा पिंकेट स्मिथसोबत घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या येत आहेत. विल स्मिथच्या ऑस्कर 2022 च्या वादानंतर या बातम्या सुरू झाल्या आहेत. ऑस्कर सोहळ्यात पत्नीच्या टक्कल पडल्याबाबत विनोद केल्यानंतर विल स्मिथने कॉमेडियन ख्रिस रॉकला कानाखाली मारली. यानंतर जगभरातून त्याच्यावर टीका झाली. रागाच्या भरात विलने ख्रिसला कानाखाली मारल्याच्याही अफवा आहेत. याचे कारण होते जेडा आणि ख्रिसचे अफेअर. याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. विल स्मिथला त्याच्या आयुष्यातील चढउतारामुळे काही काळ दूर राहायचे होते. त्यामुळेच तो भारतात येऊन शांततेत वेळ घालवत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com