Nora Fatehi Post: 'PM नरेंद्र मोदी तुमचे खूप आभार...', अभिनेत्री नोरा फतेहीने पंतप्रधानांचे केले कौतुक

Morocco Earthquake: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरोक्कोमधील जनतेसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
Nora Fatehi Post For PM Narendra Modi
Nora Fatehi Post For PM Narendra ModiInstagram

Nora Fatehi Thanks PM Modi:

बॉलिवूडची डान्सिंग स्टार नोरा फतेहीने भारतातील प्रेक्षकांच्या मनात तिचे स्थान निर्माण केले आहे. नोराच्या दंडारदर डान्स आणि लूक्सने चाहत्यांना भुरळ घातली आहे. नोरा फाटेही सध्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. चला पाहूया काय आहे ते कारण?

नोराने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. सोशल मीडियावरील नोराच्या पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधलं आहे. तिच्या या पोस्टमुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मोरोक्को खूप मोठा भुकंप झाला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील जनतेसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. यासाठी नोराने नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

Nora Fatehi Post For PM Narendra Modi
Film Producer Arrested: साऊथच्या सुप्रसिद्ध निर्मात्याला फसवणुकीच्या आरोपीखाली अटक, लग्नाचे फोटो झाले होते व्हायरल

मोरोक्कोमध्ये ६. रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. त्यानंतर जगभरात खळबळ उडाली. या भूकंपात आत्तापर्यंत २००० - २५०० लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. नोरा फतेही मोरोक्कोची असल्याने तिने ती या घटनेशी स्वतःला खूप रिलेट करते.

मोरोक्कोमधील या भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स'वर (ट्विटर) ट्विट करत या दुर्घटनेत मृत पावलेल्या मोरोक्कन नागरिकांसाठी दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत लिहिले आहे की, 'मोरोक्को भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीमुळे खूप दुःख झाले आहे. या कठीण समयी माझ्या मोरक्कन नागरिकांप्रती संवेदना व्यक्त करतो. ज्यांनी प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्यासाठी मी शोक व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत. मोरोक्को यातुन बाहेर काढण्यासाठी शक्य तेवढी मदत आम्ही देऊ.' (Latest Entertainment News)

Nora Fatehi Social Media Post
Nora Fatehi Social Media PostSaam TV

या ट्विट नंतर नोरा फतेहीने इंस्टग्राम स्टोरीतून मोदींचे ट्विट शेअर केले आहे. या स्टोरीमध्ये नोराने लिहिले आहे की, "मदतीसाठी हात पुढे करण्याऱ्या देशांमध्ये तुम्ही प्रथम होतात, प्रधानमंत्री @narendramodi यासाठी तुमचे धन्यवाद! मोरोक्कन लोक तुमच्याप्रती खूपच आभारी आणि कृतज्ञ आहेत! जय हिंद." (Celebrity)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com