Nirbhaya Squad Video
Nirbhaya Squad VideoTwitter/ @mumbaipolice

Nirbhaya Squad Video: महिलांची छेड काढणाऱ्यांची आता खैर नाही, पहा व्हिडिओ

Nirbhaya Squad Mumbai: हा व्हिडिओ एखाद्या सिनेमाच्या ट्रेलरसारखा वाटत असल्याने तो चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओला बिग बी अमिताभ बच्चन यांनी आवाज दिला आहे.
Published on

मुंबई: आज भारताच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मुंबई पोलीस दलात निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देण्यासाठी हे महिला पोलीसांच पथक (Nirbhaya Squad) कार्यरत करण्यात आलं आहे. याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मुंबई पोलीसांनी एक व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओचं दिग्दर्शन बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetti) याने केलं आहे. हा व्हिडिओ एखाद्या सिनेमाच्या ट्रेलरसारखा वाटत असल्याने तो चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओला बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आवाज दिला आहे.

हे देखील पहा -

"लांघ के तू अब लक्ष्मण रेखा, बन निडर, बन निर्भया" असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं असून हा व्हिडिओ २ मिनीटे आणि ८ सेकंदांचा आहे. रोहित शेट्टीच्या एखाद्या फिल्मप्रमाणेच अगदी प्रोफेशनल पद्धतीने हा व्हिडिओ बनवण्यात आला त्यामुळे तो एखाद्या सिनेमाच्या ट्रेलरपेक्षा काही कमी नाही. विशेष म्हणजे रोहित शेट्टीने या निर्भया पथकासाठी ५० लाखांचा चेकही दिला आहे.

निर्भया पथकाबद्दल:

मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी निर्भया पथकाबाबत (Nirbhaya Squad) माहिती दिली की, महिला सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांचे काम नाव लौकिक आहे. या प्रकरणात गांभीर्यपूर्वक आणि तातडीने त्या गुन्ह्यात दोषारोप दाखल केले जातात. महिलांसंदर्भातील गुन्हे हे कायमच मुंबई पोलिसांसाठी महत्वाचे आहे. या प्रकरणीच आपण निर्भया पथकाची स्थापना करत आहोत. जेणेकरून गरजू महिलांना तातडीने मदत मिळेल. हे पथक मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक किंवा पोलिस उपनिरीक्षकाच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले आहे.

Nirbhaya Squad Video
Work From Home Effect: लहान मुलांच्या बोलण्यावर झालाय परिणाम

यासाठी स्वतंत्र मोबाइल फोन, वाहने पुरवण्यात आली असून १०० किंवा १०३ हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. निर्भया पथकाबाबत सोशल मिडियावरही पोलिसांचे स्वतंत्र साईट फेसबुक, इंन्स्टाग्राम, आणि व्हाॅटसअॅप वर असणार आहे. मुंबई पोलिस दलात 'एम पावर' संस्थेतर्फे महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी ५ समुउपदेश केंद्र सुरू करणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com