Work From Home Effect: लहान मुलांच्या बोलण्यावर झालाय परिणाम

सद्यस्थितीत वयाची ३ वर्षे उलटून गेली तरी अनेक मुले स्पष्ट बोलत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे
Work From Home Effect: लहान मुलांच्या बोलण्यावर झालाय परिणाम
Work From Home Effect: लहान मुलांच्या बोलण्यावर झालाय परिणाम- Saam TV

मुंबई : कोरोना साथीमुळे लहान मुलांमध्ये विविध प्रकारचे आजार पाहायला मिळत आहेत. सहसा मुले एक वर्षानंतर हळूहळू बोलायला सुरुवात करतात. स्पष्ट नाही, परंतु कानावर सततचे शब्द पडल्याने आणि आपल्या ओठांच्या हालचाली ओळखून ते बोलण्याचा प्रयत्न करतात. सद्यस्थितीत वयाची ३ वर्षे उलटून गेली तरी अनेक मुले स्पष्ट बोलत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. (Children facing Speech Delay due to corona work from home)

एका सर्वेक्षणानुसार गेल्या दोन वर्षात एक ते तीन वर्षाच्या बालकांना (Child) `स्पीच डिले` म्हणजेच उशिरा बोलण्याच्या समस्येने ग्रासले आहे. हा सर्व कोरोना (Corona) काळातील टाळेबंदीचा परिणाम असल्याचे तज्ज्ञ सांगतात. हेच प्रमाण युरोपियन देशामध्ये २.५ टक्क्यांनी वाढले आहे.

बालरोगतज्ज्ञ आणि नवजात रोग विशेषज्ञ डॉ. श्रुती घटालीया म्हणाल्या, ''कोरोनामुळे दोन वर्षे सर्वजण बंदिस्त वातावरणात वावरत आहेत. खासकरून लहान मुलांवर बंदिस्त वातावरणाचा विपरित परिणाम झाला आहे. नातलगांच्या भेटीगाठी, मुलांसोबत खेळणे, त्यांच्याशी बागडण्याचे प्रमाण थांबल्यामुळे लहान मुलांमध्ये बोलण्यास उशीर होत आहे,''

'' १८ महिन्यांपर्यंतची मुलं आई, बाबा असे शब्द बोलू लागतात; परंतु बाळ दोन वर्षांचे होऊनही किमान २०-२५ शब्द बोलत नसेल किंवा साधे शब्द बोलताना अडखळत असेल, तर ही लक्षणे ‘स्पीच डीले’ची आहेत. यात घाबरण्यासारखे काहीही नसून वेळीच उपचार घेतल्यास हा आजार दूर होऊ शकतो. पालकांनी यात घाबरून जाण्याचे कारण नसून यावर चांगल्या थेरपी उपलब्ध आहेत. त्यासाठी त्यांनी लहान मुलांच्या डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे,'' असे आवाहन डॉ. घटालीया यांनी केले आहे.

Work From Home Effect: लहान मुलांच्या बोलण्यावर झालाय परिणाम
आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी रोड्सचे मोदींच्या पत्राला 'लय भारी' उत्तर

...असे होतात परिणाम
१) बाळाच्या स्पीच आणि लॅन्ग्वेज डेव्हलपमेंटमध्ये आसपासचे वातावरण महत्त्वपूर्ण भूमिका निभावते.
२) वर्क फ्रॉम होम सुद्धा याला कारणीभूत, बऱ्याच पालकांना घरी असूनही मुलांना वेळ देता येत नाही.
३) मुलांसोबत खेळणे, त्यांच्याशी बागडण्याचे प्रमाण थांबल्यामुळे लहान मुलांमध्ये बोलण्यास उशीर

स्पीच थेरपीचा सकारात्मक परिणाम
विद्याविहार येथे राहणाऱ्या शैलजा कुंटे यांचे मूल २ वर्षांचे असून त्यांचे पती परदेशात काम करतात. टाळेबंदीमुळे त्यांचे पती तेथेच अडकले होते व त्या सुद्धा टाळेबंदीमुळे एक ते दीड वर्षे बाहेर जाऊ शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुलामध्ये `स्पीच डिले`ची समस्या जाणवू लागली. यावर त्यांनी तात्काळ डॉक्टरांचा ऑनलाईन सल्ला घेऊन स्पीच थेरपी सुरू केली व त्यांचे मूल आता व्यवस्थित बोलू लागले आहे.

कोरोना साथ व टाळेबंदी याचा विपरित परिणाम सर्व वयोगटातील मुलांवर झाला आहे. मुलांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपचार करणे फार महत्त्वाचे आहे. आपले मूल जर इतरांपेक्षा वेगळे वागत असेल तर वैद्यकीय सल्ला घ्यावा.
- डॉ. श्रुती घटालीया, बालरोगतज्ज्ञ आणि नवजात रोग विशेषज्ञ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com