मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे वेब सिरीजचं वेड वाढतंच आहे. वेब सिरीजमध्ये अनेक वेगवेगळे विषय हाताळले जातात. अशीच एक सत्य घटनेवर आधारित वेब सिरीज (web series) म्हणजे नेटफ्लिक्सची (Netflix) 'दिल्ली क्राइम'. दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्याकांडवर (2012 Delhi gang rape and murder) आधारित या सिरीजच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक वाट बघत आहेत. परंतु नेटफ्लिक्सवरील या सिरीजला प्रदर्शित होण्यासाठी अजून काही कालावधी बाकी आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'दिल्ली क्राइम २' (Delhi Crime Season 2) च्या काही दृशांचे पुन्हा चित्रीकरण केले जाणार आहे. (new season of delhi crime Season 2 popular series is coming soon on netflix)
हे देखील पाहा-
मिळालेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्सच्या 'दिल्ली क्राइम २' चे काही दृश्य पुन्हा चित्रित करण्याचे आदेश मिळाले आहेत. 'दिल्ली क्राइम' वेब सिरीजचे अभिनेते राजेश तैलंग यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर दिल्लीत फिरतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
'दिल्ली क्राइम' या वेब सिरीजचे दिग्दर्शन ऋचा मेहताने केलं असून या वेब सिरीजमध्ये राजेश तैलंग, शेफाली शाह, रसिका दुग्गल, आदिल हुसैन यांच्यासारखे अनुभवी कलाकार मुख्य भूमिका साकारत आहेत. ही वेब सिरीज २०१६ मध्ये झालेल्या निर्भया बलात्कार आणि हत्याकांडवर आधारित आहे. या वेब सिरीजने जगभरात नाव कमावले असून २०२० मध्ये ४८ वा अंतराष्ट्रीय इम्मी पुरस्कार विजेता होण्याचा मान पटकावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नेटफ्लिक्सची टीम 'दिल्ली क्राइम २' साठी कोणताही धोक्का पत्करणार नाही. 'दिल्ली क्राइम २' च्या चित्रीकरणानंतर काही दृश्यांवरून नेटफ्लिक्सची टीम नाखूष होती. त्यामुळे सिरीजच्या काही दृश्यांचे पुन्हा चित्रीकरण करण्यास सांगितले आहे. तसेच कोविड आणि लॉकडाऊन मुळेही या सिरीजला प्रदर्शित होण्यास उशीर झाल्याचे सांगितले जाते.
'दिल्ली क्राइम २' ही नेटफ्लिक्सच्या खास सिरीजपैकी एक आहे, त्यामुळे नेटफ्लिक्सची टीम या सिरीजबाबत कोणतीही जोखीम घेण्यासाठी तयार नाही. क्रिएटीव्ह निर्माता राजेश मापुस्कर आणि कार्यकारी निर्माता तनुज चोपडा यांनी काही दृश्य पुन्हा चित्रित करण्याचे आदेश देले आहेत. नेटफ्लिक्स आणि निर्मात्यांनी 'दिल्ली क्राइम २' बद्दल कोणत्याही प्रकारची आधिकारिक घोषणा केलेली नाही.
Edited By - Shruti Kadam
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.