
मुंबई : गायक केके (Krishnakumar Kunnath) यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे दिग्दर्शक विशाल भारद्वाज (Vishal Bhardwaj) यांना अत्यंत दुःख झाले आहे. जुन्या दिवसांची आठवण काढत विशाल भारद्वाज म्हणाले, 'केके माझ्या लहान भावासारखा होता'. केके यांनी 'माचिस' या चित्रपटासाठी 'छोड़ आए हम वो गलियां' हे पहिलं गाणं गाऊन आपल्या संगीत कारकिर्दीची सुरुवात केली होती. या गाण्यामध्ये केके यांना हरिहरन, सुरेश वाडकर आणि विनोद सहगल यांची साथ लाभली होती. या गाण्याचे बोल गुलजार यांनी लिहिले होते आणि विशाल भारद्वाज यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले होते. या गाण्याच्या आठवणी आणि दिल्ली ते मुंबई अशा सोबत झालेल्या प्रवासाच्या आठवणींमध्ये विशाल भारद्वाज भावूक (Emotional) झाले. त्यांनी आपल्या भावना सोशल मीडियाद्वारे व्यक्त केल्या आहेत.
हे देखील पाहा -
विशाल भारद्वाज यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर केके यांचा फोटो शेअर करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारद्वाज म्हणाले, "तो माझा लहान भाऊ होता. आम्ही सोबतच मुंबईला आलो होतो. 'माचिस' या चित्रपटाच्या स्वरुपात आमचं पाहिलं काम आणि त्या कामासाठी यश सोबतच मिळालं होतं. ( 'छोड़ आए हम वो गलियां' हे त्याचं पहिलं गाणं आणि लताजीं सोबत पानी पानी रे हे त्याचं दुसर गाणं होतं) खूप आठवणी, असंख्य एकत्र क्षण आणि अत्यंत दुःख... हळूहळू सगळे वेगळे होतात" असं विशाल भारद्वाज यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहीलं आहे.
विशाल भारद्वाज यांच्या पोस्टवरुन त्यांना फार दुःख झाल्याचे समजते. १९९६ मध्ये आलेल्या 'माचिस' या चित्रपटाव्यत्तिरिक्त केके यांनी विशाल भारद्वाज यांच्या २०११ ला आलेल्या 'सात खून माफ' या चित्रपटातही गाण गायलं होतं.
केके आणि विशाल भारद्वाज यांचा दिल्ली ते मुंबई असा सुरु झालेला हा प्रवास यशाच्या शिखरापर्यंत एकसोबतच होता. त्यामुळे विशाल भारद्वाज आणि केके यांच्या एकमेकांसोबत खूप आठवणी आहेत. मात्र केके यांचं वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाल्यामुळे त्यांच्या परिवाराला आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांना अत्यंत दुःख झालं आहे. त्यांचा मित्रपरिवार त्यांच्या आणि चाहते त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
Edited By - Shruti Kadam
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.