New Marathi Movie: तरुणाईला भुरळ पाडणाऱ्या 'एकदम कडक' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

तरुणाईला पसंतीस पडणाऱ्या एका नव्याकोऱ्या आकर्षक, रोमॅंटिक, संघर्षमय, आशयघन अशा 'एकदम कडक' चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
New Marathi Movie
New Marathi MovieInstagram/ @parthbhalerao
Published On

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नवनव्या चित्रपटांमध्ये वेगळा विषय हाताळला जातो. (Marathi Movie) त्यातील काही चित्रपट समाजातील अवगुणांवर भाष्य करणारे असतात. दरम्यान या चित्रपटामधील आकर्षक सीनने प्रेक्षकांचे लक्ष विशेष वेधून घेतले होते. या आकर्षक चित्रपटांच्या यादीत आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. या धाटणीच्या अंतर्गत येणारा आणि तरुणाईला पसंतीस पडणाऱ्या एका नव्याकोऱ्या आकर्षक, रोमॅंटिक, संघर्षमय, आशयघन अशा 'एकदम कडक' चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत 'एकदम कडक' या चित्रपटात अभिनेता पार्थ भालेराव, चिन्मय संत तसेच सैराट फेम तानाजी गालगुंडे व अरबाज हे चारही तरुण कलाकार एकाच फ्रेममध्ये दिसणार आहेत. (Marathi Actors)

New Marathi Movie
Bigg Boss Marathi Season 4: 'आम्ही वेगळे झालो तर त्यांना नॉमिनेट करू' किरण मानेचा कोणाला सल्ला?

चित्रपटाचा पोस्टर पाहता, तरुण विद्यार्थी आपल्या कॉलेज लाईफचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत. ही मुलं पाहत असणारी मुलगी नक्की कोण आहे, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. आकर्षक आणि आशयघन अशा या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात 'एकदम कडक' नेमकं काय पाहायला मिळणार आहे, हे येत्या २ डिसेंबरला कळेल. 'ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत या चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची दुहेरी धुरा गणेश शिंदे यांनी पेलवली आहे.

तर पटकथा आणि संवाद कल्पेश जगताप याचे असून चित्रपटाच्या संगीताची बाजू स्व.नरेंद्र भिडे, पंकज पडघन यांनी सांभाळली आहे. तर सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, उमेश गवळी, सायली पंकज, सौरभ साळुंके यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात चित्रपटातील गाणी सुरबद्ध केली आहेत. तर चित्रपटातील गीत मंगेश कांगणे यांचे आहे.

'एकदम कडक' चित्रपटाचे पोस्टर पाहता चित्रपटाची उत्सुकता नक्कीच लागून राहिली असेल यांत शंकाच नाही, शिवाय पोस्टरवरील ती मुलगी कोण आहे याकडेही साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत, प्रेक्षकांमधील ही उत्सुकता अधिक ताणली न जाण्यासाठी येत्या २ डिसेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com