Munawar Faruqui: बेहद्द जरूरी जवाब...; मुनव्वर फारुकीने 'ऑपरेशन सिंदूर'साठी भारतीय लष्कराचे केले कौतुक

Munawar Faruqui On Operation Sindoor: कॉमेडियन मुनव्वर फारुकी याने 'ऑपरेशन सिंदूर'साठी भारतीय लष्कराचे खुलेपणाने कौतुक केले आहे. त्याने सोशल मीडियावर एक संदेश लिहून भारतीय लष्करासाठीचा अभिमान व्यक्त केला.
Munawar Faruqui On Operation Sindoor:
Munawar Faruqui On Operation Sindoor:Saam Tv
Published On

Munawar Faruqui On Operation Sindoor: कॉमेडियन मुनव्वर फारुकी याने 'ऑपरेशन सिंदूर'साठी भारतीय लष्कराचे खुलेपणाने कौतुक केले आहे. त्याने सोशल मीडियावर लिहिले, "बेहद्द जरूरी जवाब और इंसाफ वो औरतों के लिए जिनका सिंदूर मिटाया गया था!! त्याच्या या वक्तव्याने अनेक नेटकऱ्यांनी त्याचे कौतूक केले आहे.

'ऑपरेशन सिंदूर' हे ७ मे २०२५ रोजी भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकिस्तान-प्रशासित काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेले हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ले होते. या कारवाईत ९ ठिकाणी लक्ष्य साधण्यात आले, ज्यात लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या तळांचा समावेश होता. या कारवाईत सुमारे ७० दहशतवाद्यांचा खात्मा झाला असल्याचा भारताचा दावा आहे .

Munawar Faruqui On Operation Sindoor:
Marathi Actor Passed Away: मराठमोळे अभिनेते काळाच्या पडद्याआड; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

या कारवाईनंतर, अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यानेही भारतीय लष्कराचे समर्थन करत सोशल मीडियावर "दहशतवादाला अजिबात सहन केले जाणार नाही. जय हिंद की सेना" असे लिहिले. अभिनेता सुनील शेट्टी यांनीही 'ऑपरेशन सिंदूर'साठी भारतीय लष्कराचे कौतुक केले आहे .

Munawar Faruqui On Operation Sindoor:
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरची माहिती दोन महिला अधिकाऱ्यांनीच का दिली?

'ऑपरेशन सिंदूर' हे पवित्र सिंदूराच्या प्रतीकात्मकतेशी जोडले गेले आहे, जे भारतीय संस्कृतीत विवाहित स्त्रियांच्या सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. पाहलगाम हल्ल्यात विधवा झालेल्या स्त्रियांच्या वेदनांना या ऑपरेशनने न्याय दिल्याचे अनेकांनी म्हटले आहे. या कारवाईने देशभरात देशभक्तीची भावना जागृत केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com